आमच्या उज्वल भविष्यासाठी सर्वांनी मतदान कराः शालेय विद्यार्थ्यांची मतदारांना साद

0
18

प्रतिनिधी राजेंद्र मकोटे

कोल्हापूर,दि. 18 : “आमच्या उज्वल भविष्यासाठी सर्वांनी मतदान करा’ “मतदान ही एक संधी आहे योग्य उमेदवार निवडण्याची ‘माझा अभिमान माझे मतदान’ मतदार राजा जागा हो – लोकशाहीचा धागा हो, अशा विविध घोषणा देत विद्यार्थ्यांनी मतदारांना साद घालत मतदारांचे लक्ष वेधून घेतले.*

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणूकीत मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी आदर्श प्रशाला शिवाजी पेठ, मॅगो एफ एम, जायन्‍ट्स ग्रुप, रंकाळा चौपाटी, भारतीय क्रीडा व सांस्‍कृतिक मंडळांच्यावतीने मतदान जनजागृती सामुदायिक शपथ शिवाजी पेठ जुना वाशी नाका चौक येथे घेण्यात आली. प्रास्ताविकात मुख्याध्यापक आर. वाय. पाटील यांनी सर्वांनी जास्तीत जास्त मतदान करावे, यासाठी सर्व विद्यार्थी वर्गाने आपल्या पालक आणि परिचितांना मतदान करण्यासाठी आग्रहाने सांगावे, असे आवाहन केले. मतदान हक्क बजावण्याची सामुदायिक शपथ राजेंद्र मकोटे यांनी सर्वाना दिली. दैनिक सिंधुदुर्ग समाचारने प्रकाशित केलेल्या मतदान करा या विशेषांकाचे प्रकाशन राजू सावंत, बाबा महाडिक, बबिता जाधव, माधुरी भोसले-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आर.बी.माने, ए.के.देसाई, एस. एस. शिंदे, सरिता सासणे, अनिता वाळके, उर्मिला भोसले, अनिता काळे, कमल पाटील, अनिल निगडे, सागर ठाणेकर यांच्यासह पालक व विद्यार्थी उपस्‍थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here