प्रतिनिधी :अभिनंदन पुरीबुवा कोल्हापूर : भारत निवडणूक आयोगा कडून विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चा कार्यक्रम १५ आक्टोबर २०२४ रोजी जाहीर करण्यात आला त्यानंतर आज १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता विधानसभा निवडणुकीच्या तोफा थंडावल्या दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदार संघासाठी बुधवार दि २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदानापूर्वी ४८ तास अगोदर म्हणजेच आज दि १८ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजल्यानंतर निवडणूकीचा प्रचार करता येणार नाही अगर सभा घेता येणार नाही. तसेच मतदाना दिवशी दि २० नोव्हेंबर रोजी मतदान संपेपर्यंत बेकायदेशीर जमाव जमवणे आणि सार्वजनिक सभा, बैठका घेणे, पाच किंवा पाचपेक्षा अधिक लोक एकत्र येणे अशी कृत्ये करण्यास प्रतिबंध करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी अमोल येडगे यांनी जारी केले आहेत. या आदेशानुसार बेकायदेशीर जमाव जमविणे आणि सार्वजनिक सभा, बैठका घेणे अगर निवडणूक प्रचार करणे, पाच किंचा पाच पेक्षा जास्त लोक एकत्र येणे. (पूर्व नियोजित सामाजिक व धार्मिक कार्यक्रम वगळून व भारत निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेले अधिकारी व निवडणूक कामाशी निगडित कर्मचारी वगळून.) तथापी वरील आदेश मतदाना करीता घरोघरी जावून भेटी देण्यासाठी लागू राहणार नाही. या आदेशाचा कोणत्याही प्रकारे भंग केल्यास, ती व्यक्ती भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३ प्रमाणे शिक्षेस पात्र राहील. असे आदेशात नमुद करण्यात आले आहे.
Home Uncategorized १८ नोव्हेंबरच्या सायंकाळी ६ पासून निवडणूक प्रचारास बंदी :जिल्हा निवडणूक अधिकारी तथा...