प्रतिनिधी: अभिनंदन पुरी बुवा
आज दि १२ डिसेंबर गुरुवारच्या दिवसाची नोंद भारतीय क्रीडा इतिहासात सोनेरी पानांमध्ये झाली आहे. भारताचा १८ वर्षीय युवा जागतिक बुद्धिबळपटू डी. गुकेशनं सिंगापूर येथे झालेल्या जागतिक चॅम्पियनशिपमध्ये गतविजेत्या चीनच्या डिंग लिरेनचा पराभव केला. यासह तो बुद्धिबळाच्या १३८ वर्षांच्या इतिहासातील सर्वात तरुण वर्ल्ड चॅम्पियन बनला आहे.
बुधवारपासून देशातील करोडो क्रीडाप्रेमींचे डोळे या सामन्याकडे लागले होते. एक दिवस आधी जेव्हा १३ व्या गेमनंतर दोघांमधील स्कोअर ६.५-६.५ असा बरोबरीत होता, तेव्हा या विजेतेपदाच्या लढतीनं उत्सुकतेची सीमा गाठली होती. यानंतर गुकेश वर्ल्ड चॅम्पियन व्हावा यासाठी सर्वजण प्रार्थना करत होते. गुरुवारी गुकेशनं लिरेनचा ७.५-६.५ अशा फरकानं पराभव करून नवा इतिहास रचला.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, बुद्धिबळातील वर्ल्ड चॅम्पियन बनल्यानंतर गुकेशला बक्षीस म्हणून किती रक्कम मिळाली? अर्थातच, गुकेशचं हे यश कोणत्याही रकमेत मोजलं जाऊ शकत नाही, परंतु ही एक मोठी उपलब्धी आहे. गुकेश सारख्या खेळाडूंमुळे देशातील तरुणांमध्ये हा खेळ आता हळूहळू चांगलाच लोकप्रिय होतोय.
विश्वविजेता बनल्यानंतर गुकेशला बक्षीस म्हणून मिळाले. सुमारे ११ कोटी रुपये . गुकेश अजूनही खूप लहान आहे. तो केवळ १८ वर्षांचा आहे. परंतु तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, इतक्या कमी वयात तो विश्वविजेता बनण्याआधीच करोडपती बनला होता!
विश्वविजेतेपद जिंकण्यापूर्वी गुकेशची एकूण संपत्ती सुमारे ८.२६ कोटी रुपये होती. जगज्जेता झाल्यानंतर ही संपत्ती २० कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे. गुकेशच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत विविध टूर्नामेंटमधून मिळणारी बक्षीस रक्कम आणि जाहिरातींमधून मिळणारी कमाई आहे.
गुकेशच्या त्याच्या कारकिर्दीत कोणकोणत्या प्रमुख स्पर्धा जिंकल्या हे आपण जाणून घेऊया.
२०२४ – जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन (सर्वात तरुण),
२०२४– पॅरिस कॅन्डिडेट स्पर्धा विजेता (सर्वात तरुण)
२०२३– फिडे सर्किट दुसरा क्रमांक
२०२२ – चेस ऑलिम्पियाड सुवर्णपदक, संघानं तिसरा क्रमांक पटकावला
२०२२ – ॲमचेस रॅपिडमध्ये जगज्जेता मॅग्नस कार्लसनला पराभूत करणारा सर्वात तरुण खेळाडू
२०२१ – ज्युलियस बेअर चॅलेंजर्स चेस टूर विजेता. माहिती तंत्रज्ञान बातम्या