राज्याच्या संभाव्य मंत्रिमंडळाची यादी आली समोर, हे दिग्गज घेणार १४ डिसेंबर रोजी मंत्री पदांची शपथ

0
392

प्रतिनिधी:अभिनंदन पुरीबुवा.

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठी बातमी समोर येत आहे. महायुती सरकारचं गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार अखेर आता होणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला ठरला आहे. भाजप २१, शिवसेना १३, आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ९ मंत्री अशा एकूण ४३ मंत्र्यांचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे मंत्रिमंडळ विस्ताराच्या पहिल्या टप्प्यात भाजपचे १७, शिवसेनेचे १० आणि राष्ट्रवादी काँग्रेस ७ मंत्री शपथ घेतील, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. यामधील आणखी एक मोठी बातमी म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दोन मोठी खाती असणार आहेत. यामध्ये नगरविकास विभाग आणि महसूल विभाग यांचा समावेश आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे गृहनिर्माण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचं खातं असणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा याबाबत त्यापेक्षा वरचष्मा असणार आहे. कारण त्यांच्याकडे गृह आणि अर्थ ही दोन्ही महत्त्वाची आणि ताकदवान खाती असण्याची शक्यता आहे.मंत्रिमंडळ विस्तारासाठी गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या बैठकांचा सिलसिला अखेर पूर्ण झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावर गेले होते. ते आज अखेर मुंबईत परतले आहेत. तसेच मुंबईतही भेटीगाठींचं सत्र आज रात्रीपर्यंत सुरुच होतं. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज संध्याकाळी एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी जावून भेट घेतली आहे. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये मंत्रिमंडळ बैठकीबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यात ३० ते ३५ आमदार मंत्री पदांची शपथ घेणार असल्याची माहिती आहे.येत्या १४ डिसेंबरला महायुती सरकारच्या पहिल्या टप्प्यातील मंत्र्यांचा मंत्रिमंडळ विस्तार होऊन त्यांचा शपथविधीचा कार्यक्रम पार पडणार असल्याची दाट शक्यता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वत: याबाबत माहिती दिली आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखातं आणि अर्थ खातं राहणार आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत मंत्रिमंडळासाठी नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची दाट शक्यता आहे. यामध्ये आमदार भरत गोगावले, आमदार संजय शिरसाट, आमदार आशिष जैस्वाल यांना नव्याने संधी मिळणार आहे. तर माजी मंत्री दीपक केसरकर, अब्दुल सत्तार यांचा डच्चू मिळण्याची दाट शक्यता आहे. भाजपचे संभाव्य मंत्री
चंद्रशेखर बावनकुळे
चंद्रकांत पाटील
सुधीर मुनगंटीवार
गिरीश महाजन
रवींद्र चव्हाण
प्रवीण दरेकर
मंगलप्रभात लोढा
बबनराव लोणीकर
पंकजा मुंडे
आशिष शेलार किंवा योगेश सागर
संभाजी निलंगेकर
जयकुमार रावल
शिवेंद्रराजे भोसले
नितेश राणे
विजयकुमार गावित
देवयानी फरांदे किंवा राहुल आहेर
राहुल कुल
माधुरी मिसाळ
संजय कुटे
गोपीचंद पडळकर
शिवसेनेच्या संभाव्य मंत्र्यांची यादी
दादा भुसे
उदय सामंत
शंभूराज देसाई
गुलाबराव पाटील
मंगेश कुडाळकर
अर्जुन खोतकर
भरत गोगावले
संजय शिरसाट
राजेश क्षीरसागर
आशिष जैस्वाल
प्रताप सरनाईक
प्रकाश सुर्वे
योगेश कदम
बालाजी किणीकर
प्रकाश आबिटकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here