कोल्हापूर जिल्ह्याला तीन कॅबिनेट मंत्री, आता पालकमंत्री पदासाठी महायुतीतच रस्सीखेच, कोणाला मिळणार संधी?

0
127

प्रतिनिधी :अभिनंदन पुरीबुवा कोल्हापूर : राज्यात पुन्हा महायुतीच सरकार स्थापन झाल. सुरुवातीला मंत्रिमंडळ विस्तार रखडला मात्र हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला बहुचर्चित मंत्रिमंडळ शपथविधी सोहळा पार पडला, यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याच्या वाट्याला शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश अबिटकर, राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ यांना तर पुणे जिल्ह्यातील कोथरूडमधून आमदार झालेले कोल्हापूरचे सुपुत्र चंद्रकांत पाटील यांच्या रूपाने तीन कॅबिनेट मंत्री कोल्हापूर जिल्ह्याला मिळाले. सध्या खाते वाटप जरी झाले नसले तरी जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर कुणाची वर्णी लागणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागलं आहे.सध्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये पालकमंत्री पदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. मात्र यापूर्वी मंत्री चंद्रकांत पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून भाजपा आणि राष्ट्रवादीने पालकमंत्री पद भूषवले आहेत तर यंदा पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतलेल्या राधानगरी भुदरगड आजरा विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या प्रकाश अबिटकर यांचं पारड जड मानलं जात आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीने महाविकास आघाडीचा सुफडासाफ केला आणि निर्विवाद वर्चस्व मिळवले. जिल्ह्यातील १० पैकी भारतीय जनता पार्टीचे ३, शिवसेना शिंदे गट ३, जनसुराज्य शक्ती पक्षाचे २, राष्ट्रवादी अजित पवार गट १ आणि शिवसेना शिंदे गट पुरस्कृत अपक्ष १ असे उमेदवार निवडून आले.यामुळे जिल्ह्याला दोन कॅबिनेट दर्जाची मंत्रीपद देण्यात आली असून शिवसेना शिंदे गटांचे प्रकाश अबिटकर आणि अजित पवारांचे शिलेदार हसन मुश्रीफ यांचा यामध्ये समावेश आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या रूपाने तिसरं‌ कॅबिनेटमंत्री पद जिल्ह्याला मिळाल आहे. २०१९ च्या निवडणुकीत भाजपला कोल्हापूर जिल्ह्यात एकही जागा निवडून आणता आले नाही यानंतर गेल्या पाच वर्षात भाजप सहकार च्या माध्यमातून मातब्बर नेत्यांची चांगली मोट बांधली. जिल्ह्याच्या सहकारावर नियंत्रण असाव यासाठी आणि पुण्याचा पालकमंत्री पद अजित पवार यांना गेलं तर ज्येष्ठ नेते म्हणून पूर्वी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पद सांभाळलेल्या चंद्रकांत पाटील यांनाही पक्ष पालकमंत्री पदाची जबाबदारी मिळू शकते मात्र ज्यांचे जास्त आमदार त्यांचाच पालकमंत्री असं सूत्र ठरल्यास शिवसेनेकडून कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतलेल्या प्रकाश अबिटकर यांना यंदा पालकमंत्री पदाची संधी आहे. तर राष्ट्रवादीकडून सलग सहाव्यांदा निवडून आलेले हसन मुश्रीफ यांचाही पालकमंत्री पदावर डोळा आहे.गेल्या तीन वर्षांपासून लांबणीवर पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर आणि विशेषतः महायुतीला मिळालेल्या भरघोस यशानंतर यंदा पार पडण्याच्या हालचाली सुरू आहेत. या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जिल्ह्यात आपला पालकमंत्री असेल तर जास्तीत जास्त ताकद लावता येईल यासाठी महायुतीतील तिन्ही प्रमुख पक्षातील नेते पालकमंत्री पद आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणे आणि जिल्ह्याला मिळालेली मंत्रीपद यामुळे या निवडणुकीतही महायुती सहकारी संस्था आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. यामुळे कोल्हापूरचा पालकमंत्री पद नेमकं कोणाच्या पारड्यात जाणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here