कोल्हापूर, ता. २६ – प्रेक्षकांची अभिरुची जपणे हाच ध्यास समोर ठेवून चित्रपटगृहांचे नूतनीकरण केले, अशी माहिती पीआर सिनेप्लेक्सचे नारायण रुईकर यांनी आज दिली.१९३२ साली उदघाटन झालेले रॉयल आणि १९४२ पासून प्रेक्षकांच्या सेवेत असलेले प्रभात सिनेमागृह या एकपडदा चित्रपटगृहांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. कित्येक चित्रपटांनी येथे रौप्यमहोत्सव अनुभवला. प्रेक्षकांसाठी वेळोवेळी सुधारण करून त्याला अधिकाधिक सुविधा देण्याचा प्रयत्न केला.प्रेक्षकांनी एकपडदा चित्रपटगृहांकडे पाठ फिरवली असली तरी येथील व्यवस्थापनाने पुन्हा एकदा नूतनीकरणाचा ध्यास घेतला आणि चित्रपटगृह उद्यापासून पुन्हा सुरू होत आहे. यामध्ये मल्टिप्लेक्सच्या खुर्च्या, स्क्रीन, साऊंड यामध्ये बदल. मायबाप रसिक प्रेक्षकांचे कापरेटने स्वागत. एक्झिक्युटिव्ह वॉशरूम, सर्व सुविधांयुक्त असलेले कँटिन, अशा सुविधांनी सुसज्ज चित्रपटगृहे आहेत.नावात बदलप्रभात-रॉयल या ऐवजी पीआर सिनेप्लेक्स या नावाने ही चित्रपटगृहे यापुढे ओळखली जातील. दोन्ही चित्रपटगृहांना प्रेक्षकांना प्रभातच्या बाजूने प्रवेश. पुष्पा आणि बेबी जॉन, असे दोन चित्रपट आज प्रदर्शित. इतक्या साऱ्या सुविधा देऊनही तुलनेने तिकीट दर सामान्य प्रेक्षकाला परवडतील असे.या संदर्भात नारायण रुईकर म्हणाले, प्रेक्षकांची अभिरुची जपण्यासाठी नेहमीच आम्ही चांगले ते तंत्रज्ञान देण्याबरोबरच स्वच्छता, टापटीप या गोष्टींना प्राधान्य दिले. त्यामुळे प्रेक्षकांनीही भरभरून प्रतिसाद दिला आहे. या पाठबळावरच आम्ही पुन्हा एकदा नूतनीकरणाचा निर्णय घेतला आणि येथे झालेल्या बदलाला प्रेक्षक पसंत करतील, असा आम्हाला विश्वास आहे. प्राईम आणि क्लासिक असे दोनच वर्ग ठेवले आहेत. एकपडदा चित्रपटगृहाला आम्ही मल्टिप्लेक्सचा लूक देण्याचा प्रयत्न केला आहे.
Home Uncategorized प्रेक्षकांची अभिरुची जपणे हाच ध्यास – नारायण रुईकरप्रभात-रॉयल सिनेमागृह आजपासून पीआर सिनेप्लेक्स