कोकरूड/ वार्ताहर शिवतेज पतसंस्थेचे सागांव ता. शिराळा येथे सहाव्या शाखेचे उद्घाटन आमदार सत्यजित देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य संपतराव देशमुख, सागांवच्या लोकनियुक्त सरपंच सौ.अस्मिता रवी पाटील, कोकरुडच्या सरपंच सौ.अनिता देशमुख , ज्येष्ठ नेते सुखदेव पाटील ,के डी पाटील रणजित नाईक , वारणाचे संचालक शामराव पाटील, माजी सभापती चंद्रकांत पाटील , उपसरपंच शशिकांत पाटील , ज्ञानगंगा एज्युकेशन ट्रस्टचे संस्थापक बी. डी. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना आमदार सत्यजित देशमुख म्हणाले की, शिवतेज सहकारी पतसंस्थेने परिसरातील सभासदांना चांगल्या सेवा, सुविधा द्याव्यात. पतसंस्थेच्या माध्यमातून शेतकरी, छोटे, मोठे उद्योजक, व्यावसायिक यांना सहकार्य करावे. यावेळी बसवेश्वर शेटे, वसंत पाटील, हरिदास पाटील, पांडूरंग हरी पाटील , प्रदीप शेटे, विजय पाटील , विकास पाटील, अशोक कोकाटे, सत्यजित पाटील, दिलीप पाटील अशोक खांकाळ , गुलाबराव देशमुख, दादा दिवे , मोहन जिरंगे, किरण गायकवाड संस्थापक अनिलराव देशमुख, संस्थेचे चेअरमन अनिकेत देशमुख , व्हा.चेअरमन प्रतापराव शिंदे संचालक तुकाराम घोडे,तानाजी पाटील,श्रीपती सुतार,राजाराम जाधव,राहुल भोई, संस्थेचे जनरल मॅनेजर विशाल माळी शाखाधिकारी भगवान मस्कर , अंकुश पाटील, संग्राम देसाई, शुभम पोतदार, शेखर माने, प्रशांत कानकात्रे, प्रतिक बागणीकर, स्वरूप शेटे, प्रदीप पाटील, जगदीश कदम, अशोक पाटील, मारुती कुंभार आदींसह सागांव गावातील व परिसरातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Home Uncategorized शिवतेज पतसंस्थेच्या सागांव शाखेचे उद्घाटन उत्साहात संपन्न (आमदार सत्यजितराव देशमुख यांच्या हस्ते...