रणजीत निकम सामनावीर. विक्रम सिंह भोसले चषक कागल तालुका क्रिकेट असोशियन कडे..

0
63

प्रतिनिधी मेघा पाटील

कागल/ कोल्हापूर : विक्रम सिंह भोसले चषक कागल तालुका क्रिकेट असोशियन अण्णा मोगणे अकॅडमी उपविजेता.कागल तालुका क्रिकेट संघाचे पाच गडी राखून कै. अण्णा मोगणे सहारा स्पोर्ट अकॅडमी वर विजय मिळवत कै.विक्रम सिंह भोसले चषक टी-20 साखळी स्पर्धेचे विजेते पदक पटकविले.सामन्यात रणजीत निकम याने सलग दुसरे शतक पटकावले.विशांत मोरे यांनी अर्धशतक केले.कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित आणि भोसले कुटुंबीय पुरस्कृत या स्पर्धा राजाराम कॉलेजच्या मैदानावर पार पडल्या.अंतिम सामना मोगणे अकॅडमी आणि कागल संघ यांच्या झाला.प्रथम फलंदाजी करताना मोगणे अकॅडमी “अ” ने 20 षटकात सात बाद 191 धावा केल्या.विशांत मोरे 69, महेश मस्के 38, सुदर्शन कुंभार 21, शुभम माने 15, सुरज शिंदे 14, विशाल कल्याणकरणे १३ धावा केल्या.कागल संघाने पाच गडी आणि तीन चेंडू राखून विजय मिळवला.सलग दोन शतके करणारा कागल संघाचा रणजीत निकम सामनावीर ठरला.सामनावीर उत्कृष्ट फलंदाज रणजीत निकम यांनी 280 धावा केल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here