राज्यातील पत्रकारांच्या मुला-मुलींच्या करिअरसाठी मदत करणार!-ना.चंद्रकातदादा पाटील यांची डिजिटल मिडिया संघटनेला ग्वाही..

0
51

प्रतिनिधी मेघा पाटील

पुणे,दि::- “राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या लाभां व्यतिरिक्त कला, क्रीडा, संशोधन क्षेत्रात करिअर करण्याची क्षमता असलेला पत्रकारांच्या मुला-मुलींना त्या-त्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी मदत करण्याची ग्वाही भाजपचे ज्येष्ठ नेते आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात मंत्री म्हणून कार्य करण्याची तिसऱ्यांदा संधी मिळाल्यास बद्दल डिजिटल मिडिया संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या नेतृत्वाखालील पदाधिकाऱ्यांनी ना.चंद्रकांतदादा पाटील यांच्या कोथरुड येथील निवासस्थानी त्यांचा सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.संघटनेच्या कन्हेरी मठ कोल्हापूर येथे झालेल्या अधिवेशनात ना.चंद्रकांतदादा पाटील यांनी राज्यातील पत्रकारांच्या मुला-मुलींच्या करिअर व विकासावर भर देण्याचे आवाहन करुन त्यासाठी विशेष प्रतिष्ठान स्थापन करण्याची सूचना केली होती.त्यानुसार राजा माने यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या प्रतिबिंब प्रतिष्ठानला आणि विशेषतः पत्रकारांच्या मुलींच्या करिअरसाठी भरीव मदत करण्याची ग्वाही चंद्रकांतदादांनी दिली.यावेळी त्यांना श्रीविठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती भेट देण्यात आली.संघटनेचे उपाध्यक्ष सतीश सावंत, सचिव महेश कुगावकर, पदाधिकारी सूर्यकांत वायकर,तेजस राऊत, अमोल पाटील खास रे टीव्हीचे संचालक संजय कांबळे, अमोल साळुंखे, बालाजी राजपूत आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here