नेमबाज सानिया सापळे ठरली दोन राष्ट्रीय सुवर्णपदकांची मानकर

0
59

प्रतिनिधी मेघा पाटील

गारगोटी (प्रतिनिधी) – आपल्या क्रिडा क्षेत्राच्या उज्वल वाटचालीत गाररगोटीची कन्या सुदेश सापळे एकावर एक असे घवघवीत यश मिळवत ती पुढे चाललीय.नुकत्याच मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे सुरू असलेल्या ६७ व्या राष्ट्रीय नेमबाजी चॅम्पियनशिप स्पर्धेत ५० मीटर प्रोन प्रकारात या नेमबाज सानिया सापळे हिने दोन सुवर्णपदक पटकावले.तीचे हे यश लक्षणीय मानले जाते. तिने ५० मीटर प्रोन जुनियर ओपन स्पर्धेमध्ये कांस्यपदक व ज्युनिअर सिव्हिलियन स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले आहे. त्याचबरोबर ५० मीटर प्रोन या प्रकारांमध्ये ज्युनियर नॅशनल टीम मध्ये सुवर्णपदक व ज्युनिअर सिव्हिलियन टीम मध्ये कांस्यपदक मिळवून महाराष्ट्राचे नाव केले आहे. महाराष्ट्र टीमकडून खेळणाऱ्या सानियाने अंतिम सामन्यात ६२३.१ या गुण फरकाने विजेतेपद मिळवून रेकॉर्ड केले आहे. याआधी थायलंड येथील शूटिंग स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने आयोजित बँकॉक आंतरराष्ट्रीय ओपन शूटिंग चॅम्पियन स्पर्धेत कांस्यपदक पटकावले होते. आताच्या या कामी तिला आंतरराष्ट्रीय कोच सद्गुरुदास सर यांचे मार्गदर्शन मिळाले असल्याचे तीने प्रसारमाध्यमांशी बोलता ना सांगितले. टाईम्स ऑफ भुदरगड,गारगोटी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here