
प्रतिनिधी मेघा पाटील
कोल्हापूर :-महाराष्ट्राच्या उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कार्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर श्री चंद्रकांत दादा पाटील यांचे कोल्हापुरात प्रथमच आगमन झाले. यावेळी जनतेने आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रेल्वे स्थानकात त्यांचे जंगी स्वागत केले. कोल्हापूरकरांचे प्रेम पाहून श्री चंद्रकांत दादा पाटील हे भारावून गेले. प्रचंड उत्साहाने त्यांचे स्वागत केल्याबद्दल त्यांनी सर्वांचे खूप खूप आभार व्यक्त केले.

