
प्रतिनिधी : मेघा पाटील

कोल्हापूर: महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्ताने SP-9 मराठी माध्यम समूहाच्या वतीने कोल्हापूर पोलीस यांचा सन्मान करण्यात आला.2 जानेवारी 1961 रोजी महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना करण्यात आली. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलीस दलाला ध्वज प्रदान केला. त्या दिवसापासून दरवर्षी 2 जानेवारी हा पोलीस स्थापना दिन म्हणून साजारा केला जातो.पोलीस हे प्रत्येक सणाला, प्रत्येक क्षणाला सदैव तत्पर व मातृभूमीच्या रक्षणाला 24 तास ड्युटी बजावत असतात.राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या सर्व पोलीस कर्मचारी व अधिकारी आणि महिला पोलीस कर्मचारी व अधिकारी यांचा गुलाब ,पुष्पगुच्छ, मिठाई, शाल देऊन SP-9 मराठी माध्यम समूहाच्या वतीने सन्मान करण्यात आला.त्याचबरोबर नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

SP-9 मराठी माध्यम समूहाच्याा वतीने हा उपक्रम कोल्हापूर एस पी ऑफीस ते कोल्हापूर मधील शहरातील सर्व पोलीस स्टेशन, आरटीओ ऑफिस, दसरा चौक, एसीबी ऑफिस, शनिवार पोस्ट ऑफिस जवळ, सीआयडी ऑफिस, लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशन, शाहूपुरी पोलीस स्टेशन, राजारामपुरी पोलीस स्टेशन, सीबीएस ट्रॅफिक पोलीस चौकी, रस्त्यावर असणारे ट्रॅफिक पोलीस अधिकारी, एटीएस पोलीस अधिकारी, गुन्हे अन्वेषण शाखा, निर्भया पोलीस आणि सर्व पोलीस कर्मचारी व अधिकारी यांचा आदरयुक्त सन्मानन करण्यात आला.

या उपक्रमावेळी एस पी नाईन मराठी माध्यम समूहाची सर्व टीम, सागर पाटील मॅनेजिंग डायरेक्टर, श्रीकांत शिंगे, रोहित डवरी, गौरीशंकर सांगोळे, बाहुबली भोसे, आशिष कोठावळे, एस पी नाईन मीडिया निर्भय्या वुमन असोसिएशन पदाधिकारी सुनिता हनिमनाळे, प्रियंका शिर्के पाटील, व निर्भया महिला यांच्या हस्ते कोल्हापूर पोलीस कर्मचारी व अधिकारी यांचा सन्मान करण्यात आला.









