
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त विविध संस्थांतर्फे अभिवादन
प्रतिनिधी श्रीकांत शिंगे
कोल्हापूर, दि.३ (प्रतिनिधी) प्रतिकूल परिस्थितीतही स्त्रियांना शिक्षित करून स्वावलंबी बनवले व त्यांना आत्मभान देऊन स्वाभिमानाची शिकवण दिली अशा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले थोर समाज सुधारक होत्या असे मनोगत ॲड.धनंजय पठाडे यांनी व्यक्त केले.कोल्हापुरातील ऐतिहासिक बिंदू चौकामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती विविध संस्था व सत्यशोधक विचारमंचच्या वतीने साजरी करण्यात आली. याप्रसंगी ॲड.धनंजय पठाडे यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी परिवर्तनचे अध्यक्ष अमोल कुरणे, शिवशाही फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील सामंत, सत्यशोधक विचारमंचचे चंद्रकांत दिंडे, सकल मराठा समाजाचे संजय साळुंखे, मनीषा घुणकीकर, राजवर्धन कुरणे, सुलोचना माळी, डॉ.प्राजक्ता सूर्यवंशी, तारा डाके, निवास सूर्यवंशी, संभाजी चौगुले, बार्टीच्या आशा रावण, जे.बी. आत्तार आदी मान्यवर उपस्थित होते.