
प्रतिनिधी मेघा पाटील
कोल्हापूर प्रतिनिधी: रोटरी क्लब ऑफ कोल्हापुर सेंट्रल आयोजित व सौ स्मिता खामकर ,एक्सपोर्ट कन्सल्टंट डिझायनर कोल्हापुर यांच्या सहकार्याने “शहिद वीरपत्नी लक्ष्मी गर्ल्स महाविद्यालय”,तिटवे,ता-राधानगरी,जी-कोल्हापुर येथे “कलेला रोजगाराची संधी गोधडी प्रशिक्षण एकदिवसिय कार्यशाळा “घेण्यात आली. यावेळी सौ स्मिता मॅडम यांनी मुलींना कुशन,पडदे,वॉलहँगिंग,पर्स,बटवे,डेकोरेटीव बॅकड्रॉप अशा विविध प्रकारचे प्रात्यक्षिक दाखवून मुलींच्या कडून करवून घेतले.या कार्यशाळेमधे शंभरावर मुलीनी सहभाग घेतला.

कार्यशाळे नंतर मुलीनी दिलेल्या प्रतिक्रिया खूप बोलक्या व सकारात्मक होत्या.कारण ही कला प्रत्येक मुलीच्या आयुष्यात उपयोगी पडणारी असून ,त्यातून छोटा मोठा व्यवसाय ही मुली करू शकतात व आपल्या कुटुंबाची आर्थिक प्रगती करू शकतात. कार्यशाळेसाठी लागणारे साहित्याचे किट रोटरी क्लब ऑफ कोल्हापुर सेंट्रल यांच्याकडून मुलीना मोफत देण्यात आले.

यावेळी महाविद्यालयाचे प्रिन्सिपॉल श्री पालकर सर यांनी प्रास्ताविक करुन महाविद्यालया विषयी माहिती दिली. रोटरी सेंट्रल चे प्रेसिडेंट रो.संजय भगत यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शनपर भाषण केले व शाहिद महाविद्यालयाला रोटरी सेंट्रल मदत करीत राहील याची ग्वाही दिली.यावेळी प्रोजेक्ट चेअरमन रो.बदाम पाटील,रो.सागर चौगले,क्लब सेक्रेटरी रवींद्र खोत,सौ संयोगीता भगत उपस्थित होते.
