सकल मराठा समाज कागल शहर यांच्या वतीने स्वराज्य जननी जिजाऊ मासाहेब जयंती साजरी..

0
42

प्रतिनिधी प्रा. मेघा पाटील

कागल: सकल मराठा समाज कागल शहर यांच्या वतीने स्वराज्य जननी जिजाऊ मासाहेब जयंती साजरी करण्यात आली.राजमाता जिजाऊंचा आदर्श डोळ्या समोर ठेवून महिलांनी समाजामध्ये आपले स्वतःचे कर्तृत्व प्रस्थापित करावे.विविध ठिकाणी राजमाता जिजाऊंची जयंती साजरी करण्यात आली.कार्यक्रम वेळी सकल मराठा समाज अध्यक्ष श्री नितीन दिंडे यांच्या शुभ हस्ते राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्याचबरोबर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन केले.यावेळी सकल मराठा समाज अध्यक्ष श्री नितीन दिंडे, श्री शशिकांत भालकर, श्री सचिन मोकाशी, अरविंद लाड, राहुल माने, सचिन निंबाळकर, सुनील भरमकर, धीरज मोहिते, रोहन गजबर, योगेश निंबाळकर, अवधूत लोहार व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here