
एस पी नाईन प्रतिनिधी श्रीकांत शिंगे
कसबा बावडा/ कोल्हापूर: कसबा बावडा येथे संयुक्त आंबेडकर नगर, ज्येष्ठ नागरिक संघ व डॉक्टर आंबेडकर नगर सर्व महिला आयोजित, स्वराज्य जननी जिजाऊ मासाहेब जयंती साजरी करण्यात आली.3 जानेवारी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंती, 5 जानेवारी मुक्ता साळवे जयंती, नऊ जानेवारी मा फातिमा शेख जयंती व राजमाता जिजाऊ मासाहेब जयंती या सर्व महामाता यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर कसबा बावडा येथे जागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी राजमाता जिजाऊ प्रतिमेला पुष्पहार व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.


या कार्यक्रमाच्या निमित्ताने जागृती कृती कार्यक्रम दिनदर्शिका उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले.

यावेळी राजमाता जिजाऊ यांचे कार्य व आजच्या महिलांची सामाजिक जबाबदारी या विषयावर प्रमुख पाहुणे प्राचार्य जे के पवार यांनी महिलांना मार्गदर्शन केले.यावेळी SP-9 मीडिया निर्भया वुमन असोसिएशनच्या डायरेक्टर प्राध्यापिका मेघा पाटील यांनीआपले मनोगत व्यक्त केले व महिलांनी आपले समाजामध्ये स्वतःचे अस्तित्व प्रस्थापित करण्यासाठी काय केले पाहिजे.समाजामध्ये आपला स्वतःचा ठसा कसा उमटवला पाहिजे या संदर्भात महिलांना संबोधित केले.समाजामध्ये महिला सुंदर दिसण्यापेक्षा महिलांचे कर्तव्य व कर्तुत्व मोठे असले पाहिजे असे यावेळी त्या म्हणाल्या.

त्याचबरोबर पोलीस सब- इन्स्पेक्टर सोनाली नुलकर यांनी थोडक्यात आपला जीवन प्रवास सांगितला.वडील गेल्यानंतर आपल्या आईने जे पालन पोषण केले.संकटाशी एक हात करत यशापर्यंतची वाटचाल याबद्दल मनोगत व्यक्त केले.त्या यावेळी म्हणाल्या की माझ्या आईने मला एकच वाक्य बोलली होती की मी तुझ्या हिश्याची जमीन विकून तुला शिक्षण व तुझ्या करिअर साठी जे काय करावे लागते ते सर्व मी करेन परंतु माझी समाजामध्ये मान खाली घालावी लागेल असे काही कृत्य करू नकोस.हे आईचे वाक्य मी मनात ठेवून मी आज समाजामध्ये माझ्या आईची मान कशी उंचावेल यासाठी मी प्रयत्न केले व मी आज यशस्वी महिला म्हणून व पोलीस अधिकारी म्हणून समाजामध्ये वावरत असताना दिसत आहे..असे आजच्या प्रत्येक मुलीने आई-वडिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपले समाजामधील अस्तित्व निर्माण करावे.असे महिलांना त्यांनी संबोधित केले.

यावेळी प्रमुख पाहुण्यांचे गुलाब फुल व झाड देऊन सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमा वेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य जे के पवार , SP-9 मीडिया निर्भय्या वुमन असोसिएशन संचालिका प्राध्यापिका मेघा पाटील, पोलीस सब-इन्स्पेक्टर सोनाली नुलकर, दीपक जाधव यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी संयुक्त आंबेडकर नगर, ज्येष्ठ नागरिक संघ व डॉक्टर आंबेडकर नगर सर्व महिला व नागरिक उपस्थित होते.
