
एस पी नाईन प्रतिनिधी मेघा पाटील
आता महाराष्ट्र थांबणार नाही…

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा अधिवेशनात सहभाग
शिर्डी,दि.:-श्री साईबाबांची पावन नगरी शिर्डी येथे आयोजित “भाजपा महाविजयी प्रदेश अधिवेशन २०२५” केंद्रीय गृह तथा सहकारमंत्री मा.श्री अमितभाई शाह जी तसेच राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. विधानसभेच्या ऐतिहासिक विजयानंतर हे पक्षाचे पहिलेच राज्यव्यापी अधिवेशन होते. भाजपाच्या प्रमुख नेत्यांसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले भाजपाचे लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांसमवेत अधिवेशनास उपस्थित राहिलो.

भारतीय जनता पार्टी तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांचे मोलाचे योगदान आहे. राजकीय आणि सामाजिक जीवनात काम करत असताना थोरा मोठ्यांचे मार्गदर्शन लाभणे हीच एका कार्यकर्त्याची इच्छा असते. माननीय अमितजींच्या मार्गदर्शनाने कार्यकर्त्यांना काम करण्यास नवी उमेद मिळाली. तसेच राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात पक्ष भविष्यात अधिक गतीने वाटचाल करेल असा विश्वास आहे.