मजले येथे 14 वे ग्रामीण युवा मराठी साहित्य संमेलन संपन्न…

0
79

प्रतिनिधी – आशिष कोठावळे

सृजनशक्ती श्रमिक फाउंडेशन कोल्हापूरचे सृजनशक्ती साहित्य विचार मंच चिंचवाड ता. करवीर व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई यांच्या सहयोगातून आयोजित १४ वे ग्रामीण युवा मराठी साहित्य संमेलन रविवार दि. 12 जानेवारी 2025 रोजी संपन्न झाले. संमेलनाची सुरुवात मजले येथे सकाळी 08:30 वाजता ग्रंथ दिंडीने प्रारंभ झाली. त्यानंतर प्रवेश‌द्वार उ‌द्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उ‌द्घाटक नूतन आमदार श्री. अशोकराव माने हे उपस्थित होते त्यांनी प्रात्यक्षिक सादर करणाऱ्या मुलांचे कौतुक केले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून नुतन आमदार मा. श्री राहुल आवाडे यांची कन्या सानिका आवाडे व स्वागताध्यक्ष पार्श्व ॲग्रोचे मा. श्री. अविनाश पाटील उपस्थित होते त्यांनी सर्व उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले. या कार्यक्रमासाठी संमेलनाध्यक्ष म्हणून लाभलेले प्रा. डॉ. गोमटेश्वर पाटील सर, महावीर महावि‌द्यालय कोल्हापूर यांनी मराठी भाषेचा आणि साहित्याचा जागर व्हायला हवा असे मत मांडले त्याचबरोबर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ विचारवंत मा. श्री. डॉ. जी. पी. माळी सर उपस्थित होते त्यांनीही घराला मजले किती आहेत ते महत्त्वाचे नसून घरात ग्रंथ किती आहेत असे विचार मांडले. पहिल्या सत्रामध्ये प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले मा. श्री. डॉ. सुनीलकुमार लवटे सर, डॉ. बी एम हिर्डेकर सर, प्रा. डी. ए. पाटील सर व महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे निरीक्षक म्हणून लाभलेले भरत गावडे सर व मिलिंद कुलकर्णी सर हेही प्रामुख्याने उपस्थित होते.

14 वे ग्रामीण युवा मराठी साहित्य संमेलनामध्ये पाच पुरस्कार वितरित करण्यात आले.त्यामध्ये सुजनरत्न आदर्श शिक्षक पुरस्कार संजय वारके सर, सुजनरत्न आदर्श साहित्यिक पुरस्कार मा. श्री. प्राचार्य जीवन साळोखे सर, सुजनरत्न आदर्श पत्रकारिता पुरस्कार सचिन भानुसे, सुजनरत्न कृषी पुरस्कार पवन पाटील व सुजनरत्न आदर्श ग्रंथविक्रेता पुरस्कार जानराज भिलोंडे यांना प्रदान करण्यात आला.

त्यानंतर दुसऱ्या सत्रात परिसंवादामध्ये प्रथमतः बाल कथाकारांनी आपले मत व्यक्त केले. तसेच अध्यक्ष म्हणून लाभलेले प्रा. अशोक दास यांनी देखील मराठी भाषा – अभिजात भाषा या विषयावर बोलताना
म्हणाले आज मराठी साहित्यकरांची भर पडत आहे तसेच दर बरा कोसावर भाषा बदलते पण कविता लेख हे अभिजात मराठी भाषा मध्येच होते असे अमूल्य विचार त्यांनी व्यक्त केले. प्रमुख वक्ते प्रा. विष्णू वासमकर सर उपस्थित होते. कथाकथनच्या तिसऱ्या सत्रामध्ये अध्यक्ष सैनिक पाटील सर यांनी कथा सादर केली तसेच बाल कथाकारांनी आपल्या कथा व वक्तव्य सादर केले. त्यानंतर सांगता समारंभामध्ये अध्यक्ष म्हणून डॉ. सी. एन. चौगुले सर यांनी कार्यक्रमाची सांगता केली व प्रमुख वक्ते डॉ. रावसाहेब पाटील सर उपस्थित यांनीही आपले मत व्यक्त केले. काव्य संमेलनामध्ये अध्यक्ष म्हणून डॉ. दिलीप कुलकर्णी सर व प्रमुख कवी म्हणून विजय बेळके सर व अशोक भोईटे सर उपस्थित होते. या सर्व संमेलनाचे नियोजन प्रमुख संयोजक ओम संजय पाटील, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष एस. डी. पाटील सर व सचिव नयना पाटील, संयोजक प‌द्मश्री पाटील, वैभव कितुरे, दिपाली पाटील यांनी केले. या सर्व कार्यक्रमासाठी प्रा. डी. ए. पाटील सर, डॉ. सनतकुमार खोत, अंकित सुतार, रावसाहेब खोत, आप्पासाहेब पाटील, विजय पाटील, राजकुमार पाटील, शितल पाटील, सरपंच मधुमिता पाटील व उपसरपंच मीनाक्षी कुंभोजे उपस्थित होते. संमेलन अत्यंत उत्कृष्ट रीतीने संपन्न झाले याचा लाभ सर्व ग्रामस्थांनी, विद्यार्थ्यांनी व आजूबाजूच्या गावातील युवकांनी घेतला..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here