
प्रतिनिधी :अभिनंदन पुरीबुवा वाल्मिक कराड याच्यावर मकोका लावण्यात आला आहे. त्याचा ताबा सीआयडीने मागितला आहे. कराडचा ताबा मिळावा यासाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे. यामुळे वाल्मिक कराड याच्या अडचणीत वाढ झाली आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात त्याचा ताबा मिळवण्यासाठी सीआयडीने कोर्टासमोर अर्ज दाखल केला आहे. दरम्यान, वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आल्यानंतर आता सीआडीने कोर्टात अर्ज केला आहे. सीआयडीने खुनाच्या गुन्ह्यासाठी वाल्मिक कराडची चौकशी करायची आहे. त्यासाठी वाल्मिक कराडला ताब्यात द्या अशी विनंती सीआयडीने केली आहे. त्यामुळे वाल्मिक कराडला सीआयडीच्या ताब्यात देणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मकोका कायद्याचं स्वरूप. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा, १९९९ मकोका हा कायदा संघटित गुन्हेगारी आणि दहशतवादाशी लढण्यासाठी महाराष्ट्र सरकारने लागू केला आहे. या कायद्यानुसार, राज्य सरकारला या समस्यांना सामोरे जाण्यासाठी विशेष अधिकार आहेत. मकोका कायद्यातील काही वैशिष्ट्ये: या कायद्यात पाळत ठेवण्याचे अधिकार आहेत.या कायद्यात शिथिल पुरावा मानके आहेत.या कायद्यात प्रक्रियात्मक सुरक्षा आहे.या कायद्यात मृत्यूदंडासह अतिरिक्त फौजदारी दंड निर्धारित करण्याची तरतूद आहे.मकोका कायदा कधी लागू होतो?संघटित गुन्हेगारी आणि दहशतवाद यासारख्या समस्यांना सामोरे जाण्यासाठी मकोका कायदा लागू केला जातो. संतोष देशमुख खून प्रकरण, यासारख्या प्रकरणांमध्ये मकोका कायदा लागू करण्यात आला आहे.