
प्रथिनिधी मेघा पाटील
कोल्हापूर: स्वामी विवेकानंद यांची जयंती ही देशभरात राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरी केली जाते व याचेच औचित्य साधून आज दिनांक 13 जानेवारी 2025 रोजी महाविद्यालयामध्ये व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. सदर व्याख्यानास रामकृष्ण मठाचे स्वामी बुद्धानंद प्रमुख पाहुणे व व्याख्याते म्हणून उपस्थित होते. या व्याख्यानामध्ये स्वामीजींनी विवेकानंद यांच्या जीवनावर अनेक उदाहरणांद्वारे प्रकाशझोत टाकला. तसेच त्यांचे विचार खूप उत्तमरीत्या महाविद्यालयातील मुलांना सांगितले. त्याचप्रमाणे जीवनामध्ये विद्यार्थ्यांनी विवेकानंद यांचे विचार अवगत केले तर त्यांच्या आयुष्याला चांगलीच कलाटणी मिळेल असे सुद्धा त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अमोल दीक्षित यांनी केले तसेच संपूर्ण कार्यक्रमाच्या नियोजनाची जबाबदारी रासेयो विभाग प्रमुख उद्धव आतकिरे व प्रतीक्षा पाटील यांनी सांभाळली. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे संचालक डॉ. अनिलकुमार कुलकर्णी व प्राचार्य डॉ. राजकुमार बगली यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच संस्थेच्या सेक्रेटरी मा. सौ. शोभा तावडे यांचे प्रोत्साहन मिळाले.