प्रतिनिधी :अभिनंदन पुरीबुवा. कोल्हापूर :शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध कायम आहे. शेतकऱ्यांनी राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे. शक्तिपीठ महामार्गविरोधी शेतकरी संघर्ष समितीकडून आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.
२४ जानेवारी रोजी एकाचवेळी महामार्ग होऊ घातलेल्या १२ जिल्ह्यांत आंदोलन होणार आहे. फक्त एका जिल्ह्यात शक्तिपीठ महामार्गाला विरोध आहे असा खोटा प्रचार करणाऱ्या सरकारची आंदोलक पोलखोल करणार आहेत. १२ जिल्ह्यातील शेतकरी संबंधित जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार आहेत. शक्तिपीठ महामार्गाच्या संदर्भात घेण्यात आलेल्या ऑनलाईन झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान या १२ जिल्ह्यातून यामध्ये
कोल्हापूर, सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, परभणी, बीड, हिंगोली, वर्धा, नागपूर, यवतमाळ, नांदेड, लातूर, सोलापूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा महामार्गाला विरोध आहे.
Home Uncategorized शक्तिपीठ महामार्गाविरोधात आता शेतकरी रस्त्यावर उतरणार ;२४ जानेवारी रोजी राज्यव्यापी आंदोलनाची हाक