
प्रतिनिधी : बाहुबली भोसे
हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील कुंभोज या गावांमध्ये मराठा समाजातील तरुण-तरुणीच्या उज्वल भविष्यासाठी मराठा भवन साठी खासदार धैर्यशील माने यांच्या विशेष प्रयत्नातून मराठा भवन उभारणीसाठी बांधकामाचे आज भूमिपूजन आणि उद्घाटन करण्यात आले. यावेळी विशेष उपस्थिती हातकलंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला




यावेळी बोलत असताना कुंभोज गावच्या मराठा समाजाच्या मागणीनुसार मराठा भवन बांधकामाच्या कामाकरिता खासदारानी फंडातून विशेष निधी लावण्यात आला. यावेळी बोलत असताना कुंभोजच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहीन असे प्रतिपादन खासदार धैर्यशील माने यांनी केले. यावेळी खासदार धैर्यशील माने यांचा सत्कार आणि सन्मान समस्त मराठा बांधव यांच्याकडून करण्यात आला.यावेळी उपस्थित कुंभोज गावचे मराठा समाजातील तरुण-तरुणी आणि ग्रामस्थ बांधव आणि कुंभोज गावचे सरपंच स्मिता चौगुले,आणि उपसरपंच अशोक आरगे,वारणा दूध संघाचे संचालक अरुण पाटील, किरण माळी, जवाहर साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन बाबासाहेब चौगुले, अमर पाटील, निवास माने,दत्तात्रय मिसाळ, रवीराज जाधव, सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहित तोरसकर यांनी केले.


