
एस पी नाईन प्रतिनिधी
मुंबई : रायगड जिल्ह्यातील लोणेरे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ येथे कार्यरत प्रकल्पग्रस्त कंत्राटी उमेदवारांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्यासंदर्भात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये प्रकल्पग्रस्त उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरीत सामावून घेण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.
या बैठकीस रोजगार हमी योजना,फलोत्पादन मंत्री भरतशेठ गोगावले, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी.वेणुगोपाल रेड्डी,उपसचिव अशोक मांडे, संतोष खोरगडे, प्रताप लुबाळ, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ.विनोद मोहितकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कारभारी काळे, विद्यापीठाचे कर्मचारी व संबंधित अधिकारी उपस्थित होते.