
कोल्हापूर – शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्या आणि महिला सबलीकरणासाठी कार्यरत स्वंयसिध्दा संस्थेच्या संस्थापिका कांचनताई परुळेकर यांचे निधन झाले . त्या 74 वर्षाचे होत्या . बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये अधिकारी पदावर कार्यरत असताना त्यांनी स्वच्छे चा सेवानिवृत्ती घेऊन सन 1992 साली त्यांनी स्वयंसिद्धा संस्थेची स्थापना केली होती. महिलां वर्गाचे सक्षमीकरणासह त्यांना आर्थिक दृष्ट्या बलशाली करणे त्यांच्यात मार्केटिंगची कला कौशल्य वाढवणे तसेच ग्रामीण भागात स्वयंपूर्ण सबलीकरण करणे या त्रिसूत्रीवर त्यांनी काम केले होते . टाटा सोशल फाउंडेशन पासून विविध संस्थांनी त्यांच्या कार्याची दखल घेतली होती . इचलकरंजीच्या प्रसिद्ध फाय फाउंडेशनने त्यांना पुरस्कार देऊन गौरवले होते
गुरुवार दिनांक 27 मार्च रोजी सकाळी नऊ वाजता त्यांच्या साईक्स एक्स्टेशन राजारामपुरी येथून घरातून अंत्ययात्रा निघणार आहे .