
प्रतिनिधी मेघा पाटील
कोल्हापूर: हॉकर्स जॉईंट एक्शन कमिटी व श्रमिक सेवा संस्थेच्या माध्यमातून कोल्हापूर शहरातील फेरीवाले स्टॉल वाले छोटे मोठे व्यावसायिक इत्यादीसाठी फूड प्रशिक्षण शिबिर चे आयोजन करण्यात आले होते हे फूड प्रशिक्षण 24 मार्चपासून सुरू झाले आहे पहिला दिवस राजारामपुरी या ठिकाणी घेण्यात आले व दुसरा दिवस कामगार भवन दसरा चौक येथे घेण्यात आले.

यावेळी या प्रशिक्षणा साठी अन्न व औषध प्रशासन विभागाचे सह आयुक्त विलास लोहकरे साहेब, कोल्हापूर महानगरपालिकेचे इस्टेट विभागाचे अधिकारी विलास साळुंखे श्रमिक सेवा संस्थेच्या अध्यक्षा सौ निर्मला प्रमोद कुराडे संस्थेच्या सेक्रेटरी सौ शैलजा पोतदार सौ सुमन गिरीश शिंदे शहर अध्यक्ष संदीप शिवाजी साळुंखे शाहू मैदान खाऊ गल्ली संघटनेचे सचिव विक्रांत भागोजी जोतिबा रोड फेरीवाला अध्यक्ष रेडेकर तसेच कोल्हापूर शहरातील विविध ठिकाणचे स्टॉल वाले फेरीवाले हे मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रशिक्षणाला ट्रेनर म्हणून पुण्याचे जुब्लीएंट फूड वर्कर्स प्रायव्हेट लिमिटेड चे निलेश विलास भमकर यांनी फेरीवाले स्टॉल वाले इत्यादींना अन्नसुरक्षा स्वच्छतेबाबत छान मार्गदर्शन केले या अन्नसुरक्षा प्रशिक्षणामुळे स्टॉल वाल्यांना त्याचा व्यवसाय आणखीन चांगल्या प्रकारे कसा करता येईल याचे मार्गदर्शन मिळाले त्यांचा स्टॉल वाल्यांना निश्चित फायदा होईल त्याचबरोबर प्रशिक्षणासाठी उपस्थित असणाऱ्या प्रत्येक स्टॉल वाल्यांना एफ एस एस आय प्रमाणपत्र ही देण्यात येईल 24 मार्च ते 27 मार्च या चार दिवसांमध्ये कोल्हापूर शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये हे प्रशिक्षण घेतले जाणार आहे तेही विनामूल्य तरी या प्रशिक्षणासाठी सर्व स्टॉल वाले छोटे व्यवसायिक आईस्क्रीम विक्रेते अन्नपदार्थ विकणारे सर्व व्यवसायिक यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे आव्हान हॉकर्स जॉईंट ॲक्शन कमिटीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा निर्मला प्रमोद कुराडे यांनी केले.

