
एस पी नाईन प्रतिनिधी रोहित डवरी
खोची/ कोल्हापूर : महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश या राज्याचे श्रद्धास्थान असणाऱ्या वारणा नदीच्या काठावरील खोची गावचे श्री भैरवनाथ यात्रा उत्सव दरवर्षी लाखो भाविकांच्या साक्षीने सोहळापार पडला जातो. यावेळी अनेक शासन काट्या, गुलाल खोबऱ्याची उधळण पारंपारिक वाद्य, सामील असतात.
गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर पंचांग वाचन केले जाते यावेळी प्रसिद्ध असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्या हातकणंगले तालुक्यातील खोची गावची यात्रा खास आकर्षण असते. गुढीपाडव्याच्या निमित्ताने सालाबाद प्रमाणे यात्रेचे तारीख आणि मुहूर्त जाहीर केले . दिनांक १२एप्रिल २०२५ रोजी रात्री बारा वाजता पालखीचे प्रस्थान होईल दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी १३ एप्रिल २०२५ रोजी श्री भैरवनाथ आणि जोगेश्वरी चा विवाह सोहळा पहाटे सूर्योदयास होईल. यावेळी श्री भैरवनाथ आणि जोगेश्वरी चा विवाह नाथपंथी डवरी समाज यांच्या साक्षीने केला जातो. अनेक मानापाण्याच्या शासन काट्या, मानकरी, सेवेकरी, हे उपस्थित असतात.




दिनांक २० एप्रिल २०२५ रोजी रविवारी खोची गावची गाव यात्रा आहे. यावेळी गुरव, गोसावी ,डवरी यांना अन्नदान करून देवाला पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो आणि पात्र पूजाही केली जाते.
दिनांक २१ एप्रिल २०२५ रोजी सोमवारी भैरवनाथ आणि आई जोगेश्वरीचा गाव गोंधळाचा कार्यक्रम मंदिरामध्ये होणार आहे.
रविवार दिनांक २७ एप्रिल २०२५ रोजी पाकळी यात्रा संपन्न होणार आहे. यावेळी पालखी सकाळी ११ वाजता वारणा नदीच्या काठावर जाते. अशा पद्धतीने अनेक विविध यात्रेनिमित्त पारंपरिक पूजा, आणि आरती ,मानकरी ,पुजारी, सेवेकरी, करत असतात.



पंचांग वाचन गुरुवर्य श्री भाविक महाराज यांनी केले.गुढीपाडव्याच्या या पंचांग वाचनाच्या वेळी समस्त ग्रामस्थ आणि श्री भैरव देवस्थान उप समितीचे सर्व पदाधिकारी समस्त गुरव गोसावी डवरी समाज उपस्थित होता…