कोल्हापूर विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्षपदी सुखदेव गिरी यांची निवड

0
97

कोल्हापूर प्रतिनिधी : प्रियांका शिर्के पाटील

प्रसार माध्यमातील प्रतिनिधींना आधी स्वीकृती पत्रिका देण्यासाठी राज्य शासनाने विभागीय आधी स्वीकृती समित्या 11 जुलै 2023 च्या शासन निर्णयान्वये गठीत केल्या आहेत.

कोल्हापूर विभागीय अधिस्वीकृती समितीच्या झालेल्या बैठकीत मतदान प्रक्रियेने समितीचे सदस्य श्री सुखदेव शामराव गिरी यांचे अध्यक्षपदी निवड करण्यात आली असल्याची माहिती समितीचे सदस्य सचिव तथा उपसंचालक (मा) सुनील सोनटक्के यांनी दिली.

कोल्हापूर विभागीय माहिती कार्यालयात आज अध्यक्ष निवडीसाठी कोल्हापूर विभागीय आधी स्वीकृती समितीची बैठक संपन्न झाली.


या बैठकीला समितीचे अशासकीय सदस्य श्री.गजानन नाईक ,निखिल पंडितराव, समीर देशपांडे, प्रताप नाईक, सदस्य सचिव तथा उपसंचालक माननीय सुनील सोनटक्के जिल्हा माहिती अधिकारी कोल्हापूर सचिन अडसुळे ,जिल्हा माहिती अधिकारी सांगली संप्रदा बिडकर, सहाय्यक संचालक फारूक बागवान , उपसंपादक रणजीत पवार उपस्थित होते.

प्रसारमाध्यमांशी संबंधित व्यक्तींना आधी स्वीकृती देण्यासंबंधी महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र व प्रसारमाध्यम अधीक्षकृती नियमान्वये राज्य शासनाने राज्य व विभागीय आधी स्वीकृती समित्या गठीत केल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here