
SP-9 प्रतिनिधी : श्रीकांत शिंगे .
कोल्हापूर/पन्हाळा: आळवे गावचे सुपुत्र वएका शेतकरी कुटुंबातील एस पी नाईन मराठी माध्यम समूहाचे व एस पी नाईन मीडिया निर्भय्या वुमन असोसिएशनचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री सागर शिवाजी पाटील यांची US Space and Rocket Centre NASA Department अंतर्गत स्पेस कॅम्प एज्युकेशन टूर चे प्रोजेक्ट डायरेक्टर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती स्पेस कॅम्प हंट सव्हील, Alabama President सुदेशना पी. यांनी अधिकृत पत्राद्वारे जाहीर केली. सागर पाटील यांचीही नियुक्ती आंतरराष्ट्रीय स्तरावर वैज्ञानिक शिक्षणाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना जागतिक शैक्षणिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी करण्यात आली आहे. ते स्पेस कॅम्प एज्युकेशन टूर्स साठी रणनीती आखणे प्रचार मोहीम राबविणे आणि आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना सहज visa प्रक्रिया सुलभ करण्याचे कार्य पाहणार आहेत.
Space camp कॅम्प बद्दल:
पेस कॅम्प 1982 मध्ये स्थापन झाले असून us space and rocket Centre सेंटरचे प्रमुख कार्यक्रम आहे. हे Alabama राज्य सरकारच्या आयोगाच्या देखरेखी खाली चालते. गणित विज्ञान आणि अभियांत्रिकी विषयातील आवड वाढविण्यासाठी अत्याधुनिक प्रशिक्षण अंतराळवीर सम्युलेशन आणि स्पेस मशीनचे वास्तव अनुभव या त्यामध्ये दिले जातात. NASA नासाच्या भागीदारीमुळे विद्यार्थ्यांना अंतराळ संशोधनाची संबंधित वास्तविक अनुभव आणि ऐतिहासिक मिशनच्या अवशेषांची थेट संवाद साधण्याची संधी मिळते. आज पर्यंत 120 हून अधिक देशातील 8 लाखाहून अधिक विद्यार्थी या त्यामध्ये सहभागी झाले आहेत. हा कॅम्प शिक्षक आणि पालकांच्या मते विद्यार्थ्यांसाठी एक जीवन बदलणारा अनुभव ठरला आहे.

माननीय श्री सागर शिवाजी पाटील मॅनेजिंग डायरेक्टर एस पी नाईन मराठी माध्यम समूह व एस पी नाईन निर्भय्या वुमन असोसिएशन यांचे मत:-
NASA space camp educational tour च्या प्रोजेक्ट डायरेक्टर पदाची जबाबदारी मिळणे हा माझ्यासाठी अभिमानाचा आणि सन्मानाचा क्षण आहे. त्याचबरोबर माझ्यासाठी आयुष्यातील अविस्मरणीय क्षण आहे. विज्ञान आणि अंतराळ शिक्षण अधिक सहज आणि सर्वसमावेशक करणे हे माझे ध्येय असेल. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मी माझ्या कामाची जबाबदारी प्रामाणिक पणे करेन. या प्रतिष्ठित संधीसाठी मी पूर्ण समर्पणाने काम करेन. आंतरराष्ट्रीय एवढी मोठी संधी मिळणे हे माझे भाग्यच समजेन…
