
SP-9 पुणे प्रतिनिधी
पुणे , ०६ एप्रिल : राम नवमी आणि भाजपाच्या ४५ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून, आज भाजपा कसबा मंडल अध्यक्ष राजेंद्र काकडे यांनी आपले जनसंपर्क कार्यालय सुरू केले आहे. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. भारतीय जनता पक्षाच्या विचारसरणीचा प्रसार व लोकसेवेची तळमळ कायम असलेल्या काकडे यांच्यासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा आहे.यावेळी चंद्रकांत पाटील यांनी राजेंद्र काकडे यांना शुभेच्छा दिल्या. जनसंपर्क कार्यालय नागरिकांचे समस्या सोडविण्याचे केंद्र व्हावे, अशी अपेक्षा देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली. या कार्यालयाच्या माध्यमातून जनसेवा अधिक व्यापक आणि प्रभावी होईल हे नक्की. यावेळी आमदार हेमंत रासने, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांच्यासह भाजपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.