
प्रतिनिधी रोहित डवरी
कोल्हापूर प्रतिनिधी:कोल्हापूर, 06 एप्रिल 2025 शरीरसौष्ठव आणि आरोग्यप्रेमींना समर्पित “मोरया जिम अँड फिटनेस” या अत्याधुनिक जिमचे उद्घाटन मोठ्या उत्साहात आणि मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. ओंकार पार्क, सिद्धेश्वर शाळेजवळ, सानेगुरुजी वसाहत येथे झालेल्या या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमाचे उद्घाटन पोलीस उपाधीक्षक ( DYSP) सदानंद सदांशिव (भारत राखीव बटालियन -3, कोल्हापूर) यांच्या हस्ते करण्यात आले. आपल्या भाषणात त्यांनी आरोग्य राखण्याचे महत्त्व अधोरेखित करत “मोरया जिम अँड फिटनेस” च्या टीमचे अभिनंदन केले. यावेळी, पोलीस उपाधीक्षक (DYSP) सुजितकुमार क्षीरसागर, डॉ. सुरेश राठोड (संस्थापक – डी. एस. राठोड फाउंडेशन व मुख्य अधिकारी – इंडियन पोलिस मित्र), तसेच सहायक उपनिरीक्षक उमाजी साळुंखे(तात्या) या मान्यवरांनी प्रमुख उपस्थिती लाभल्याने सोहळ्याची शोभा वाढली. कार्यक्रमाचे सन्माननीय निमंत्रक सीमा जयसिंग नाईक आणि जयसिंग आप्पासो नाईक (मिस्टर टर्न इंडियाश्री) होते. त्यांच्या पुढाकाराने आणि मार्गदर्शनाने हा उपक्रम अधिक प्रभावी ठरला. कार्यक्रमाच्या निमित्ताने नवीन जिमची पाहणी, आधुनिक उपकरणांची ओळख व सदस्यत्वाबाबत माहिती देण्यात आली. उपस्थित नागरिकांनी जिमच्या सुविधांचे कौतुक करत मोठ्या संख्येने सभासदत्व नोंदवले. या प्रसंगी “मोरया जिम अँड फिटनेस” च्या टीमने उपस्थित सर्व पाहुण्यांचे आभार मानले आणि आगामी काळात आरोग्यदायी समाजनिर्मितीसाठी सातत्याने काम करण्याचा संकल्प व्यक्त केला.