
प्रतिनिधी रोहित डवरी
कोल्हापूर प्रतिनिधी: निवडणुका आल्या की हिंदुत्वाचा नारा द्यायचा… समाजात जातीजातीत भांडण लावायची आणी समाजामध्ये द्वेषाच विष पेरायच..समाजात जातीभेदाच्या राजकारणावरती मताची पोळी भाजून झाल्यानंतर मग मात्र सोयीने आणि सवडीनं काढलेल हिंदुत्व विसरायचं… असं वाटतं तस सोयीच हिंदुत्व आपलं नाही.. तर हृदयात राम आणि हाताला काम या ब्रीदवाक्यान जीवापाड जपलेलं हिंदुत्व आपल आहे

भगव्याशी श्रद्धा प्राणपणान जपत मा. शिवसेनाप्रमुखांच्या विचारान सांभाळलेल्या व जपलेल्या या कोल्हापूरवरती एकीनं व मजबुतीने प्रचंड ताकतीन आणि इर्षेने भगवा पुन्हा डौलान व जिद्दीन फडकलेला मला पुन्हा अभिमानान बघायला यायचं आहे असं प्रतिपादन आज कोल्हापूर जिल्ह्याच्या आढावा बैठकीमध्ये शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी मातोश्री येथे काढले..* *बटेंगे तो कटेंगे ..एक है तो सेफ है या निवडणुकीच्या नाऱ्यानंतर .सौगात ए मोदी. या धार्मिक पुष्टीकरणावरती येऊन थांबलेला भाजपचा तथाकथित धर्मनिरपेक्षतेचा बुरखा हा औरंगजेबाच्या कबरीवरती येऊन थांबला..

ज्या उद्योगपतीं मित्रांनी सांभाळलेला आणि एसएमएस वर मोठ्या झालेल्या आपल्या पक्षाच्या धनाढय मित्रांना जमिनी कवडीमोल भावाने देण्यासाठी वफ्फचा विषय काढणाऱ्या सत्ताधारांनी वाढलेली प्रचंड महागाई, राजकाराणातील गुन्हेगारी, सर्वसामान्यांचे चाललेले हाल आणि मंत्री व त्यांच्या बगलबच्यांच बेधुंदशाहीमध्ये वागणं, जबाबदार मंत्र्यांनी असंवेदनशीलतेचा कळस गाठत राष्ट्रपुरुषांच्याबद्दल कष्टकऱ्यांच्याबद्दल व राष्ट्राचा पोशिंदा शेतकऱ्यांच्याबद्दल काढलेले अनुद्गार यावर कंटाळलेल्या जनतेला धर्माचा डोस पाजत हिंदुत्वाचे तथाकथित गोडवे गात जनतेची फसवणूक करणाऱ्या या भाजपाचा व त्यांच्या ह्या तथाकथित सहकाऱ्यांचा फसवा बुरखा ताकतीने पाडायचं काम* *छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराजांच्या करवीर नगरीतील स्वाभिमानी शिवसैनिकांनी प्रचंड ईर्षने करावं

.सत्ता नाही तरी संघर्ष संपलेला नाही जिवापाड जपलेली संघटना, गावोगावी पसरलेले हिंदुत्वाचा वसा आणि वारसा सांगणारे मावळे यांना घेऊन या सत्ताधाऱ्यांना व त्यांच्या सत्तांधलेला आपणच वेसण घालू शकतो उद्या येणाऱ्या निवडणुका.. जिंकायच्याच.. या ईर्षने आपण लढवून पुन्हा एकदा या राज्यावरती व कोल्हापूरवर* *शिवसेनेचाच भगवा असेल असं अभिमानी आणि स्वाभिमानी काम कोल्हापुरातील नागरिकांच्या मदतीने सर्व शिवसैनिक बंधू-भगिनींनी मेहनतीने करावं अस प्रतिपादन उद्धवजी ठाकरे यांनी यावेळी केले*… *यावेळी उपस्थित -शिवसेना नेते विनायक राऊत, शिवसेना आमदार मिलिंदची नार्वेकर,शिवसेना संपर्कप्रमुख उपनेते अरुण भाई दुधवडकर, शिवसेना उपनेते जिल्हाप्रमुख श्री संजय पवार,शिवसेना सह संपर्कप्रमुख श्री विजय देवणे, जिल्हाप्रमुख संजय चौगुले , वैभव उगळे, सुनील शिंत्रे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये मातोश्री येथे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी मार्गदर्शन केले* कृपया वरील बातमी आपल्या लोकप्रिय दैनिकांमध्ये प्रसिद्ध करून सहकार्य करावे ही नम्र विनंती आपला नम्रसंजय पवारउपनेते, जिल्हा प्रमुख शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व कोल्हापूर जिल्ह्यातील ईतर सर्व शिवसेनेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये मातोश्री येथे कोल्हापूरच्या आढावा बैठकीमध्ये केले.
