
कोल्हापूर- भगवान महावीर जयंती महोत्सवाचे औचित्य साधून “जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (जीतो) ध्या वतीने जगभरामध्ये 108 देशांमध्ये व भारतामध्ये सहा हजाराहून अधिम ठिकाणी नवकार महामंत्र सामुदायिक विश्व विक्रमाने जगत गुरु भारता चा दमदार प्रांरभ झाला आहे . संपूर्ण जगामध्ये युद्ध संघर्ष, आतंकवाद, दुराचार, हिंसाचार वाढत असताना संपूर्ण विश्वामध्ये शांतता प्रस्थापीत व्हावी व सुख-शांती आनंद पसरावा या वैश्विक उद्देशाने जितो अपेक्स या अग्रणी संस्थेचे अध्यक्ष पृथ्वीराज कोठारी आणि केंद्रीय टीमच्या प्रखर इच्छेने अखेर हा संकल्प पूर्ण झाला आहे त्यामुळे समस्त जैन समाजाची आता जबाबदारी वाढली आहे असे भावपूर्ण मनोगत सुप्रसिद्ध उद्योजक संजय घोडावत यांनी व्यक्त केले . सैनिक दरबार हॉल येथे आज सकाळी साडेसात ते 11 या वेळेत संपन्न झालेल्या या भावपूर्ण सोहळ्यामध्ये पंचक्रोशीतील दहा हजाराहून अधिक जैन बांधवांचं अन्य जैन प्रेमी अभ्यासक यांची विक्रमी उपस्थिती होती यामध्ये एकाच लाल रंगाच्या साड्या परिधान केलेल्या महिलांची संख्या ही लक्षणे अशी होती .

कोल्हापूर चॅप्टरचे सचिव अनिल पाटील यांनी सर्वांचे स्वागत करताना ‘जैन धर्मातील नवकार महामंत्र हा शक्तीशाली मंत्र मानला जातो. या मंत्रामध्ये विश्वातील सर्व अरिहंत साधू उपाध्याय यांना नमन केले जाते. या मंत्राने आत्मकल्याण होऊन मोक्षमार्गाची दिशा मिळते. या मंत्राद्वारे सामूहिक मंत्र पठण होऊन एक वैश्विक ऊर्जा निर्माण होऊन जगभरामध्ये सुख-शांती नांदेल असा विश्वास व्यक्त केला


दिल्लीमधील विज्ञान भवनामध्ये एकत्रित नमोकार महामंत्र पठण करतील भव्य आणि दिव्य अशा कार्यक्रमाचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोद
