
एस पी नाईन पुणे प्रतिनिधी
पुणे, १४ एप्रिल : श्री म्हातोबा टेकडीवरील मंदिर हे कोथरुडकरांचे श्रद्धास्थान. या मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावरील पायऱ्यांची दुरवस्था झाली होती. या पायऱ्यांची पुनर्बांधणी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी लोकसहभागातून केली. याबाबत सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत पाटील यांनी माहिती दिली.
चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि, कोथरुडकरांचे श्रद्धास्थान श्री म्हातोबा टेकडीवरील मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावरील पायऱ्यांची दुरवस्था झाली होती. त्यामुळे भाविकांना मंदिरात जाताना मोठी कसरत करावी लागत असे. सदर पायऱ्यांची पुनर्बांधणी करण्याची मागणी त्यांच्याकडे सातत्याने करण्यात येत होती. यादृष्टीने चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घेत लोकसहभागातून सदर मंदिराकडे जाणाऱ्या मार्गाचे विकासकाम केले. ही सेवा म्हातोबा चरणी त्यांनी अर्पण केली.
चंद्रकांत पाटील यांनी आपल्या मतदारसंघात वेगवेगळ्या सोयीसुविधा पुरविल्या आहेत. त्यातीलच एक म्हणजे श्री म्हातोबा टेकडी. येथे चंद्रकांत पाटील यांनी हजारो वृक्ष लावण्याचा उपक्रम देखील राबविला होता. आणि आता मंदिराच्या पायऱ्यांची पुनर्बांधणी करून नागरिकांची उत्तम अशी सोय त्यांनी केली आहे.