दलित, मराठा, ओबीसी देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात जाऊ शकत नाहीत – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील..

0
16

एस पी नाईन पुणे प्रतिनिधी

पुणे , १४ एप्रिल : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आज पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांनी भाष्य केले. तसेच उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेवर पाटील यांनी चोख प्रत्युत्तर देखील दिले. राज्यातील 235 आमदारांनी देवेंद्रजींना मुख्यमंत्री केले. सर्वमान्य व्यक्तीमत्व महाराष्ट्रात मुख्यमंत्री आहे. आरक्षण नसतानाही सुविधा देण्याच्या योजना फडणवीस यांनी सुरु केली. दलित, मराठी, ओबीसी देवेंद्रजी विरोधात जाऊ शकत नाहीत. परंतु संजय राऊत यांच्या मनातील हा जातीवाद असल्याचे पाटील यावेळी म्हणाले. चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले, संजय राऊत जे म्हणतील ते खरे आहे, असे म्हणण्यापेक्षा खोट आहे, असेच म्हणता येईल. राज्यातील 235 आमदारांनी देवेंद्रजींना मुख्यमंत्री केले. सर्वमान्य व्यक्तीमत्व महाराष्ट्रात मुख्यमंत्री आहे. आरक्षण नसतानाही सुविधा देण्याच्या योजना फडणवीस यांनी सुरु केली. दलित, मराठा, ओबीसी देवेंद्रजी विरोधात जाऊ शकत नाहीत, असे पाटील म्हणाले. संजय राऊत यांच्या मनातील हा जातीवाद आहे. तो व्यवहारात येऊ शकणार नाही, असे पाटील यांनी ठामपणे सांगितले. राज्यात मराठे मुख्यमंत्री होते. त्यांनी मराठा समाजास आरक्षण दिले नाही, पण ते आरक्षण फडणवीसांनी दिले. ते कधी जातीवाद करत नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. *देवेंद्र फडणवीस विरुद्ध फुले आंबेडकर अशा प्रकारचा वाद संजय राऊत यांच्या मनात*पाटील पुढे म्हणाले, देवेंद्रजींनी 2014 ते 2019 मध्ये आरक्षणाची सुविधा दिली. त्यापूर्वी मराठा समाजास आरक्षण नसतानाही सुविधा दिल्या. वसतीगृह केली. भत्ता दिला. त्यांच्याविरुद्ध दलित, मराठा, ओबीसी जाऊ शकत नाही. ओबीसी मंत्रालय देवेंद्रजींनी सुरू केले. देवेंद्र फडणवीस विरुद्ध फुले आंबेडकर अशा प्रकारचा वाद संजय राऊत यांच्या मनात आहे. हा त्यांच्या मनामध्ये असलेला जातीवाद आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.*अमित शाह यांचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल 500 पानांचे पुस्तक*चंद्रकांत पाटील म्हणाले, संजय राऊत हे रोज शोध लावतात. देशाचे केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या रायगड दौऱ्याच स्वागत करायचे सोडून संजय राऊत गेले तीन दिवस टीका करत आहेत पण त्यांना कुणी प्रतिसाद देत नाहीत. देशाचे गृहमंत्री या नात्याने आणि शिवभक्त म्हणून अमित शाह यांचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल 500 पानांचे स्वतः तयार केलेलं पुस्तक येत आहे. ते वाचल्यावर राऊत यांना चक्कर येईल कि शिवाजी महाराजांचा अभ्यास त्यांनी किती केला आहे. अमित शाह यांचा शिवाजी महाराज यांचाबद्दलचा अभ्यास राऊत यांना समजेल, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सत्तेसोबत यायचंय. पण त्यांना कोणी घेत नाही. त्यामुळे अमित शाह यांच्यावर संजय राऊत वारंवार टीका करत असल्याचा थेट आरोप पाटील यांनी केला आहे. *संजय राऊत यांनी पक्षाकडे लक्ष द्या*चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले महायुतीत खूप अलबेल आहे, सगळी माणस एकत्र काम करत आहेत . महापालिकेतील तुमचे लोक सोडून जात आहे. मुंबईत तुमचे 57 सिटींग नगरसेवक शिंदेंकडे गेले. पुण्यात 5 नगरसेवक भाजपत आले, त्यामुळे संजय राऊत यांनी पक्षाकडे लक्ष द्या, असा सल्ला चंद्रकांत पाटील यांनी यांनी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here