
एस पी नाईन पुणे प्रतिनिधी
पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील हे आपल्या कोथरूड मधील नागरिकांना सोयीसुविधा पुरविण्यासाठी नेहमीच प्रयन्तशील असतात. कोथरूड मधील नागरिकांसाठी पाटील यांनी विविध उपक्रम राबविले. त्यातीलच एक उपक्रम म्हणजे मानसी. कोथरूड मधील महिला आणि मुलींना योग्य मार्गदर्शन आणि सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे. याच उपक्रमातील लेकींना आंब्याचा आनंद लुटता यावा, यासाठी चंद्रकांत पाटील यांनी खास आंबा पार्टीचे आयोजन केले होते. चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि, उन्हाळा सुरू झाला की प्रत्येकाला ओढ लागते ती फळांचा राजा असलेल्या आंब्याची. कोथरूड मधील ‘मानसी उपक्रमा’तील माझ्या लेकींना आंब्याचा आनंद लुटता यावा, यासाठी आंबा पार्टीचे आयोजन केले होते. यावेळी सर्व लेकींनी आंब्याची चव चाखण्याचा आनंद मनसोक्त लुटला. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद मनाला अतिशय समाधान देणारा होता, असे मत पाटील यांनी व्यक्त केले. कोथरुड मधील प्रत्येक मुलगी ही आपलीच लेक आहे या भावनेतून कोथरूडमधील मुलींच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी “मानसी” उपक्रम सुरू केला. या उपक्रमातील लेकींसाठी पाटील यांनी यापूर्वी ‘छावा’ सिनेमाचे मोफत स्क्रीनिंग देखील आयोजित केले होते. चंद्रकांत पाटील या लेकींच्या प्रगतीसाठी नेहमीच प्रयन्तशील असतात.