
एस पी नाईन पुणे प्रतिनिधी
पुणे : संत विचार प्रबोधिनी, पुणे व डॉ. रामचंद्र देखणे साहित्य कला प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा “वै. डॉ. रामचंद्र देखणे स्मृती कीर्तन सेवा पुरस्कार २०२५” वितरण सोहळा रविवारी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आला. ज्येष्ठ कीर्तनकार आणि संत श्री माणकोजी महाराज बोधले यांचे वंशज ह.भ.प. ॲड. डॉ. जयवंत महाराज बोधले यांना तसेच लोककलासेवा पुरस्कार लोकसाहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे यांना, रामजन्मभूमी तीर्थक्षेत्राचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंदगिरीजी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

ज्येष्ठ टाळवादक माऊली टाकळकर यांचाही विशेष सन्मान करुन, या सर्वांच्या कार्याप्रति चंद्रकांत पाटील यांनी कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे, डॉ. रामचंद्र देखणे साहित्य कला प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. भावार्थ महाराज देखणे, वासकर महाराज फडाचे श्री राणा महाराज वासकर, श्री संत ज्ञानेश्वर देवस्थान समितीचे विश्वस्त श्री योगी निरंजननाथ, गायक अवधूत गांधी, संत ज्ञानेश्वर माऊलींची मुक्ताई चित्रपटातील अभिनेते समीर धर्माधिकारी, अभिनेत्री स्मिता शेवाळे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.