प्रतिनिधी SP-9
कोल्हापूर दि. २० एप्रिल रोजी येथील महावीर महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी मेळावा आयोजित केला आहे. प्रतिवर्षाप्रमाणे महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी या मेळाव्यात सहभागी व्हावे असे आवाहन या मेळाव्याचे समन्वयक कॅप्टन प्रा.उमेश वांगदरे यांनी केले.
महाविद्यालयाच्या वरीष्ठ विभागातील कला व वाणिज्य या विद्याशाखांमधील विद्यार्थ्यांचा हा मेळावा असणार आहे. या मेळाव्यासाठी कॉलेजची माजी प्राचार्य डॉ सुनीलकुमार लवटे,प्राचार्य डॉ. संभाजीराव कणसे, डॉ. राजेंद्र लोखंडे आणि माजी प्राध्यापकही उपस्थित राहणार आहेत. माजी विद्यार्थी आणि महाविद्यालय यांच्या ऋणानुबंध अधिक दृढ करण्यासाठी हा मेळावा आयोजित केल्याची माहिती महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. उषा पाटील यांनी सांगितले. या मेळाव्यासाठी संस्थेचे चेअरमन ॲड. के ए कापसे आणि संस्थेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन महाविद्यालयाकडून करण्यात आले आहे .