
महावीर महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा संपन्न..
प्रतिनिधी मेघा पाटील
महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांच्या यशावरच महाविद्यालयाची ओळख निर्माण होऊन महाविद्यालयाची प्रगती मोजली जाते. महावीर महाविद्यालयाच्या प्रगतीत माजी विद्यार्थ्यांचा सहभाग नेहमीच असतो. असे प्रतिपादन आचार्यरत्न देशभूषण शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श्री मोहन गरगटे यांनी केले. ते माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्याच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते. महाविद्यालयाच्या प्रांगणात माजी विद्यार्थी मेळावा आचार्य विद्यानंद सांस्कृतिक सभागृहात पार पडला.
यावेळी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. संभाजीराव कणसे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आपापल्या क्षेत्रात सतत कार्यमग्न असणे गरजेचे आहे. या महाविद्यालयाने दिलेले माजी विद्यार्थी समाजात आपली ओळख निर्माण करत आहेत. अनुराधा देसाई, मोडक , पोलिस उप निरीक्षक सोनसाळे , सरदार जाधव,फातिमा मुल्लानी या माजी विद्यार्थ्यांनी आपली मनोगती व्यक्त केली.डॉक्टर श्रीकांत बच्चे यांनी कॉमर्स विभागाच्या वतीने व डॉक्टर गोमटेश्वर पाटील यांनी कला शाखेच्या वतीने आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. उषा पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. प्रकाश कांबळे, प्रा. डॉ. सुरेश संकपाळ यांनी केले.
१९८३ पासून ते २०२४ पर्यंतच्या बॅच मधील माजी विद्यार्थ्यांनी यावेळी उपस्थिती लावली होती.यावेळी आजी – माजी विद्यार्थ्यांनी संगीत मैफलीचे देखील आयोजन केले होते. या विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन कॅप्टन उमेश वांगदरे यांनी केले.
यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्या डॉ. उषा पाटील, माजी प्राचार्य राजेंद्र लोखंडे, यांच्यासह कला व वाणिज्य विभागाचे सर्व प्राध्यापक, माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित उपस्थित होते.
मा. मोहन गरगटे, माजी प्राचार्य संभाजीराव कणसे, प्रभारी प्राचार्या डॉ उषा पाटील, कॅप्टन उमेश वांगदरे आणि तेजस्विनी आरगे