नमस्ते नाशिक फाउंडेशनच्या अध्यक्ष स्नेहल देव यांच्या संकल्पनेतून उन्हाळ्यात थंड पिण्याच्या पाण्याचे मटके दान…

0
16

प्रतिनिधी मेघा पाटील

नाशिक प्रतिनिधी: आपल्या थोड्याशा सहकार्याने कोणाची तरी तहान भागेल या उद्देशाने नमस्ते नाशिक फाउंडेशनच्या अध्यक्ष स्नेहल देव यांच्या संकल्पनेतून उन्हाळ्यात थंड पिण्याच्या पाण्याचे मटके दान स्वरूपी देण्यात आले, **दान करून पुण्य कमवा* या उपक्रमांतर्गत ही वस्तू भेट म्हणून देण्यात आली, पाणी पिण्यासाठी मटक्याचे दान करणे हे एक धार्मिक आणि सामाजिक कार्य मानले जाते. “थंड पाण्याचा मटका” एक उपक्रम गरजू व वंचितांसाठी या अनुषंगाने जलालपूर या छोट्याशा गावात निराधार, गरजू व शेतमजूर कुटुंब यांच्या करिता थंड पिण्याच्या पाण्याचे मटके भेट स्वरूपात देण्यात आले .आपल्याला आता थंड पाणी प्यायला मिळेल याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती दिसून येत होता. तेच समाधान संस्थेच्या सदस्यांच्याही चेहऱ्यावरती दिसून येत होते. जलालपूर या छोट्याशा गावात गरजू कुटुंबांना या उपक्रमांतर्गत मटके भेट म्हणून देण्यात आले .महावीर इंटरनॅशनल चे अनिल नहार यांचे मोलाचे सहकार्य लाभले. ‌यावेळी संस्थेचे अध्यक्ष स्नेहल देव, महावीर इंटरनॅशनलचे अनिल नहार, जलालपूर गावातील सामाजिक कार्यकर्ते बाळूभाऊ बडदे, संस्थेचे खजिनदार संदीप देव, आदी मान्यवरांच्या हस्ते वस्तूंचे वाटप करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here