
प्रतिनिधी रोहित डवरी
काश्मीर येथील भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ मुस्लिम बोर्डिंगच्या वतीने निदर्शने काश्मीर येथे झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ मुस्लिम बोर्डिंगच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभागी होऊन या भ्याड हल्ल्याचा निषेध नोंदवला. दसरा चौकात शाहू महाराजांच्या पुतळ्यासमोर झालेल्या या आंदोलनात भ्याड हल्ला करणाऱ्या प्रवृत्तीच्या निषेधार्थ जोरदार घोषणा देण्यात आल्या. या आंदोलनात मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर यांच्यासहकादर मलबारी प्रशासक रफिक शेख, रफिक मुल्ला हाजी लियाकत मुजावर हाजी जहांगीर अत्तार, बापू मुल्ला हाजी शौकत मुतवल्ली, मौलाना मुबीन बागवान, फारुख पटवेकर,अल्ताफ झाँजी, अबू ताकीलदार बाबा साहेब मुल्लाणी, इक्बाल ताशिलदार, जिलानी शेख, वहिदा शिकलगार,सुचिता मंडलिक, नाझणीन मोमीन, नुजहत हिरोली, मरियम आगलावे,सादिया मलबारी, आलिया उस्ताद,मिसबाह पठाण, साबिया सिद्दीकी हे सहभागी झाले होते.