
एस पी नाईन प्रतिनिधी रोहित डवरी
कोल्हापूर: दिनांक 26 एप्रिल 2025 रोजी होसुर,तामिळनाडू येथे नुकत्याच पार पडलेल्या आशिया आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक संशोधन विद्यापीठ अर्थात ASIA INTERNATIONAL CULTURE RESERCH UNIVERCITY यांच्या वतीने यावर्षीचा CULTURE ARTS AND SOCIAL SERVICE म्हणजेच सांस्कृतिक कला आणि सामाजिक कार्य यासाठी आदरणीय रजनी संजय गोरड यांना HONOURY DOCTORATE AWARD म्हणजेच डॉक्टर या उच्च पदवीने सन्मानित करण्यात आले. हजारोच्या संख्येने उपस्थित असलेल्या या सन्माननीय सोहळ्याला विविध क्षेत्रातले मान्यवर तथा डॉक्टरी विश्वातले नामांकित डॉक्टर्स उपस्थित होते .रजनी संजय गोरड यांना डॉक्टरेट ही पदवी प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे सर्वच स्तरातून मोठं कौतुक होत आहे ऑर्केस्ट्रा म्युझिकल धमाकाच्या निर्मात्या तथा दिग्दर्शिका रजनी संजय गोरड यांचे नेहमीच सामाजिक आणि त्याचबरोबर गरजू कलावंत किंवा समाजातील विविध क्षेत्रातील गरजू लोकांना नेहमीच मदतीचा सदैव हात राहिलेला आहे .अनेक सामाजिक संस्थाच्या माध्यमातून त्यांचे मोठे कार्य आहे .