जोतिबा मंदिर परिसरात ‘इंडियन पोलीस मित्र भारत’च्या वतीने स्वच्छता मोहिम संपन्न..

0
71

कोल्हापूर प्रतिनिधी

जोतिबा मंदिर परिसरात ‘इंडियन पोलीस मित्र भारत’च्या वतीने स्वच्छता मोहिम संपन्न

कोल्हापूर – जोतिबा मंदिर परिसरात ‘इंडियन पोलीस मित्र भारत’ या संस्थेच्या वतीने भव्य स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. या उपक्रमात संस्थेचे विविध पदाधिकारी, स्वयंसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत परिसर स्वच्छतेसाठी मोलाचे योगदान दिले. या मोहिमेची संकल्पना हातकणंगले तालुकाध्यक्ष सुभाष कुंभार यांची होती. मोहिमेत ॲड. डॉ. सुशील अग्रवाल, सल्लागार अनिता पाटील, कोल्हापूर ग्रामीण अध्यक्ष प्रकाश खतकर, जिल्हा उपाध्यक्ष ईश्वरा गायकवाड, जिल्हा कोअर कमिटी अध्यक्ष लहू कांबळे, जिल्हा संयोजक प्रमोदिनी माने, तज्ञ संचालक अवधूत पाटील, नारायण लोहार, अधिकृत प्रतिनिधी बाळासो पाटील, कस्तुरी निकम, संदीप सैसाले, किरण पांगे, शशिकांत बामणे, राजू आवळे, सांगली जिल्हा अध्यक्षा पद्मा कांबळे, डॉ. अशोक सूर्यवंशी, जयश्री कांबळे, विश्वास कार्वेकर, अमोल जाधव, शाहिद पेंढारी, गणपती पाटील आदींसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. स्वच्छता मोहिमेत सकाळपासूनच मंदिर परिसरातील कचरा संकलन, झाडलोट, जनजागृती फलक लावणे, पर्यावरण रक्षणाचे संदेश देणे अशी विविध कामे पार पडली. यावेळी बोलताना डॉ. सुरेश राठोड म्हणाले, “स्वच्छता ही केवळ जबाबदारी नाही, ती एक राष्ट्रसेवा आहे. भुदरगड किल्ला, पंचगंगा घाटानंतर आता जोतिबा मंदिर परिसरात सेवा देताना आम्हाला अभिमान वाटतो. ही मोहिम पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.” कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेचे व ‘इंडियन पोलीस मित्र भारत’ संस्थेचे तज्ञ संचालक सुधाकर कांबळे आणि ज्योतिबा ग्रामपंचायतचे धनाजी शिंगे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांसाठी चहा-नाश्त्याचे उत्तम नियोजन करून सर्वांचे मनोबल वाढवले. स्थानिक नागरिक आणि भाविकांनी या मोहिमेचे कौतुक करत संस्थेच्या सामाजिक कार्यास भरभरून पाठिंबा दर्शविला. ‘इंडियन पोलीस मित्र भारत’ ही संस्था डॉ. सुरेश राठोड फाउंडेशन व मार्शल योगा अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने चालवली जाते. संस्थेचे उद्दिष्ट राष्ट्रसेवा, सामाजिक कार्य आणि जनजागृतीमध्ये सातत्याने सक्रिय राहणे हे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here