

प्रतिनिधी मेघा पाटील
कोल्हापूर दि. 25 : दर्जेदार वैद्यकीय शिक्षणाबरोबरच सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल प्रमाणे येत्या काही वर्षांत शासकीय रुग्णालयांमध्ये अत्याधुनिक वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे सांगून येत्या काही वर्षात सीपीआर रुग्णालय देशात दर्जेदार हॉस्पिटल बनेल, अशीअसा विश्वास वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या 2019 च्या बॅचचा दीक्षान्त समारंभ मंत्री श्री मुश्रीफ यांच्या हस्ते पार पडला, यावेळी ते बोलत होते. यावेळी श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.

यावेळी वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे, कान, नाक, घसा विभाग प्रमुख डॉ. अजित लोकरे, कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या संचालिका डॉ. रेश्मा पवार, सूक्ष्म जीवशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ.विजय कुलकर्णी, औषध वैद्यक शास्त्र विभागाचे सहायक प्राध्यापक डॉ. राहुल पाटील आदी उपस्थित होते. मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, डॉक्टर म्हणून पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी कोरोना सारख्या प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत शैक्षणिक यश मिळवले आहे.

धर्मादायकडे नोंदणी असणाऱ्या काही खाजगी रुग्णालयांकडून रुग्णांकडून रुग्णांना वेठीस धरले जात आहे. खरं तर नागरिकांची सेवा करण्याच्या आणि नागरिकांचे आरोग्य सुधारण्याच्या हेतूने वैद्यकीय क्षेत्रात विद्यार्थी पदार्पण करतात, पण सर्व डॉक्टरांनी प्रामाणिक भावना ठेवून गोरगरीब गरजू रुग्णांना माफक दरात चांगल्या आरोग्य सेवा देऊन लोकसेवेचे व्रत अंगिकारणे आवश्यक आहे. सीपीआर रुग्णालयाला गौरवशाली इतिहास असून केंद्र सरकार व राज्य शासनाच्या वतीने या रुग्णालयात अधिकाधिक दर्जेदार वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांनी प्रास्ताविकातून वैद्यकीय महाविद्यालयाच्या शैक्षणिक वाटचाली बाबतची माहिती दिली.या बॅचचे सचिव केतन ठाकूर यांनी पदवीदान समारंबाबत माहिती दिली.