सरोजिनी मंच आयोजित,प्रथमच महिला गायकांचा हिंदी व मराठी कराओके गाण्यांचा कार्यक्रम मोठ्या दिमाखात संपन्न…

0
160

सरोजिनी मंच आयोजित,प्रथमच महिला गायकांचा हिंदी व मराठी कराओके गाण्यांचा कार्यक्रम मोठ्या दिमाखात संपन्न…

SP-9 प्रतिनिधी श्रीकांत शिंगे

कोल्हापूर: कोल्हापूर येथे प्रथमच महिला गायकांचा हिंदी व मराठी सुरेख कराओके गाण्याचा कार्यक्रम शाहू स्मारक भवन दसरा चौक येथे पार पडला. सरोजिनी बहुउद्देशीय सामाजिक संस्था कोल्हापूर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या संस्थेच्या संस्थापिका अध्यक्ष सौ सुनीता हनिमनाळे यांनी या कार्यक्रमाचे नेटके नियोजन केले होते. दिग्गज प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन करून आणि झाडाला पाणी घालून कार्यक्रमाची सुरुवात केली. सुनिता हनीमनाळे या सामाजिक कार्यामध्ये सदैव सक्रिय असतात. त्याचबरोबर महिलांच्यासाठी बरेच उपक्रम राबवत असतात. अनेक महिलांना या सरोजिनी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून हक्काचं व्यासपीठ देण्याचा प्रयत्न करत असतात.

सौ सुनीता हनिमनाळे ह्या एस पी नाईन मीडिया निर्भय्या वुमन असोसिएशनच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या कार्याध्यक्ष म्हणून काम करत आहेत. आपल्या संस्थेचे काम पाहत मीडिया निर्भया वुमन या संस्थेमध्ये ही त्यांचे उल्लेखनीय काम आहे. प्रत्येक कार्यक्रमांमध्ये त्यांचा सहभाग असतो. त्या महिला नेतृत्व करण्यात यशस्वी ठरल्या आहेत. त्यामुळेच कोल्हापूर येथे प्रथमच महिला गायिका चा हिंदी व मराठी कराओके गाण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी महिलांच्या कडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रेक्षक वर्ग व महिलांकडून या कार्यक्रमाबद्दल सौ सुनीता हनीमनाळे यांचे कौतुक व आभार व्यक्त केले. हा खास महिलांचा गायनाचा कार्यक्रम मोठ्या दिमाखात व आनंदात संपन्न झाला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभावती गायकवाड यांनी पाहिले. या कार्यक्रमा वेळी प्रमुख पाहुणे श्री बाळासाहेब वाघमोडे मुद्रांक जिल्हाधिकारी, विजयसिंह भोसले अध्यक्ष महाराष्ट्र व्यवसाय प्रशिक्षण मंडळ, एकनाथ विष्णू कुंभार मुख्याध्यापक विक्रम हायस्कूल, सागर पाटील मॅनेजिंग डायरेक्टर SP-9 मराठी माध्यम समूह, अशोक विष्णु शिंदे रिटायर्ड एक्झिक्यूटिव्ह इंजिनिअर एम एस ई बी, सौ मेघा पाटील डायरेक्टर SP-9 मीडिया निर्भया वुमन असोसिएशन, भारती गायकवाड अध्यक्ष मैत्री ग्रुप रूकडी, सुरेखा शेजाळे न्यूज अँकर तारा न्यूज रिपोर्टर, राजेंद्र बंडोपंत तामगावकर असिस्टंट डिव्हिजनल मॅनेजर एलआयसी व सरोजनी मंच बहुउद्देशीय सामाजिक संस्था पदाधिकारी प्रेक्षक वर्ग सर्व महिला गायक यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here