
एसपी नाईन उपसंपादक स्वप्निलल गोरंबेकर
कागल: आज बस्तवडे ता. कागल येथे ग्रामपंचायत च्या पटांगणामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीप्रमाणे जयंती साजरी करण्यात आली. सुरुवातीस संयुक्त शिवजयंती उत्सव समिती यांच्यावतीने ज्योत आणण्यात आली. यावेळी या ज्योतीचे स्वागत मान्यवरांच्या हस्ते करून सदर ज्योत गावातून शालेय विद्यार्थी विद्यार्थीनींनी यांच्या सहभागातून फेरी करण्यात आली. यावेळी या ज्योतीचे स्वागत सर्व ग्रामस्थांनी पाणी व ओवाळून स्वागत केले. त्यानंतर ग्रामपंचायत च्या पटांगणामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा पूजन करण्यात आले. यावेळी सामुदायिकपणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरती घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर गावातील दमलेल्या सर्व मान्यवर तरुण मंडळ व शालेय विद्यार्थ्यांना जयंतीनिमित्त खाऊ वाटप करण्यात आले. कार्यक्रमासाठी गावातील सरपंच उपसरपंच, सर्व सदस्य ,ग्रामसेवक , पोलीस पाटील, मुरगुड पोलीस सुरक्षा विभाग, विविध मान्यवर, सर्व माता बंधू भगिनी, व शालेय विद्यार्थी, मुख्याध्यापक व सर्व स्टाफ, तंटामुक्त अध्यक्ष व त्यांची समिती व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते. शेवटी जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर चे आयोजन केले आहे.