महावीर एन.सी.सी.ची यशस्वी घोडदौड……..

0
61

एसपी नाईन प्रतिनिधी मेघा पाटील

कोल्हापूर प्रतिनिधी : १९८३ मध्ये महावीर महाविद्यालयात एन.सी.सी. विभाग सुरू करण्यात आला. 6 MAH GIRLS’ BN NCC मुलीसाठी व 1 MAH ARTY BTY NCC मुलासाठी असे दोन युनिट कार्यरत झाले. मेजर डॉ. रूपा शहा व मेजर नामदेव खंदारे यांनी अत्यंत समर्थपणे या विभागाची पायाभरणी करून एक दैदिप्यमान परंपरा निर्माण केली. मेजर डॉ रूपा शहा यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले यातील राष्ट्रपती पुरस्कार व भारत सरकारद्वारे तह हयात मेजर पदवी हे अत्यंत महत्वाचे मेजर नामदेव खंदारे यांना एन.सी.सी. मधील त्याच्या योगदानाबद्दल भारतसरकारतर्फे ‘ तपपूर्ती पुरस्कार ‘ प्रदान करण्यात आला.

२०१४ पासून एन.सी.सी.विभागाची जबाबदारी कॅप्टन उमेश वांगदरे व कॅप्टन डॉ सुजाता पाटील याच्याकडे सोपवण्यात आली.या अधिकाऱ्यांनी आधीच्या भक्कम पायाच्या जोरावर एन.सी.सी.विभागाच्या विकासाची गती वाढवली. मागील दहा वर्षात (कोरोना काळ वगळता) महावीर एन.सी.सी.ची ख्याती राष्ट्रीय पातळीवरून आंतरराष्ट्रीय पातळीवर नेहुन ठेवली.२०२३ मध्ये सीनियर अंडर ऑफिसर कीर्तन रवींद्र मिरजकर या छात्राची निवड भारत सरकारच्या ‘समुंदर प्रहरी’ या योजनेअंतर्गत बँकॉक, थायलंड,जकार्ता,इंडोनेशिया या देशात झाली. या उपक्रमामध्ये संपूर्ण भारतातून केवळ १२ छात्राची निवड झाली होती. तर २०२४ मध्ये नेपाळ या ठिकाणी ‘ युवक आदान – प्रधान (Youth Exchange) अंतर्गत परत सिनियर अंडर ऑफिसर किर्तन रवींद्र मिरजकर यांची निवड झाली या उपक्रमात पाकिस्तान,श्रीलंका, नेपाळ, बांगलादेश मधील एन.सी.सी. छात्र व सैन्य अधिकारी सहभागी झाले होते. एन.सी.सी. मधील सर्वात प्रतिष्ठित समजली जाणारी गोष्ट म्हणजे नवी दिल्ली येथे होणारी २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन परेड व पंतप्रधान रॅली.एन. सी.सी मधील प्रत्येक कॅडेट व प्रत्येक महाविद्यालयाचे हे एक मोठे स्वप्न असते.महावीर एन.सी.सी.मधील छात्र, एन.सी.सी.अधिकारी, प्राचार्य, संस्थेचे चेअरमन,सचिव, सर्व संचालक यांच्या एकत्रित प्रयत्नातून या क्षेत्रात महावीर महाविद्यालयाने इतिहास घडवला यामागची मोठी प्रेरणा म्हणजे संस्थेने एक अस धोरणच ठरवून टाकले की जो कॅडेट २६ जानेवारी दिल्ली परेड साठी ( RDC ) जाईल त्याच्या आई-वडिलांच्या हस्ते महाविद्यालयातील २६ जानेवारी चे झेंडावंदन होईल. आणि २०२१ मध्ये आमोद माळवी,२०२३ मध्ये किर्तन मिरजकर,२०२४ मध्ये कृष्णदेव गिरी, २०२५ मध्ये समर्थ पाटील असे सलग कॅडेट प्रजासत्ताक दिन परेड मध्ये निवडले गेले. या छात्रानी आपले मनोगत व्यक्त करताना उपरोक्त धोरणामुळे आम्हाला प्रेरणा मिळाली असे अनेक वेळा सांगितले. असे अनेक छात्र फायरिंग, थल सैनिक कॅम्प, आर्मी डे परेड या अत्यंत महत्त्वाच्या शिबिरामध्ये सहभागी झाले. मागील ५ वर्षात ७५ पेक्षा अधिक छात्र भारतीय सैन्यदल, भारतीय नौदल, महाराष्ट्र पोलीस व इतर सैन्य दलात निवडले गेले. मुलांच्या बरोबरच ऋतुजा गायकवाड हिची BSF मध्ये तर श्रेयल पाटील हिची सेना मिलिटरी पोलीस मध्ये निवड झाली. आंतरराष्ट्रीय योग दिन, रक्तदान, वृक्षारोपण, स्वच्छ भारत अभियान, असे अनेक सामाजिक उपक्रम राबवले.२०१९ व २०२१ मध्ये आलेल्या महापुरात बचाव कार्य व पुनर्वसन कार्यात महावीर एनसीसी ने सामाजिक भान ही जपत उत्कृष्ट कार्य केले ज्याची प्रशंसा तत्कालीन जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्तांनी केली. सस्थेने एनसीसी साठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देत विशेष सहकार्य केले .संस्थेचे चेअरमन अँड के. ए.कापसे साहेब, सचिव मा. मोहन गरगटे साहेब, सर्व संचालक मंडळ यांचे व्यक्तिगत मार्गदर्शन व प्रोत्साहन नेहमीच एन.सी.सी. विभागाला लाभत असते. यातूनच महावीर महाविद्यालय एनसीसी विभागाची घोडदौड अविरतपणे सुरू आहे व पुढेही आणखीन वेगाने सुरू राहील…..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here