
कोल्हापूर : विद्यार्थ्यांना शालेय जीवनात खेळाची आवड लागावी, खेळाची जपणूक व्हावी यासाठी जिल्हा, विभाग, राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरती खेळामध्ये प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण देण्यासंदर्भात शासन निर्णय आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा क्रीडा कार्यालयाकडे सादर केलेल्या एका विद्यार्थीनीच्या प्रस्तावाला क्रीडा अधिकारी यांनी नामंजुरी दिली. नामंजूर का केले अशी विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. कोल्हापूर जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या कार्यालयामध्ये गोंधळ असल्याचे भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या ध्यानात आले. यांच्या हालगर्जीपणामुळे संबंधित विद्यार्थीनीचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने कोल्हापूर जिल्हा क्रीडा कार्यालयामधील अधिकारी यांच्या विरोधामध्ये आंदोलन करणार असल्याची माहिती भारतीय विद्यार्थी मोर्चा कोल्हापूर जिल्हाध्यक्ष प्रथमेश कांबळे तसेच सोशल मिडीया प्रभारी किशोर माणकापुरे यांनी दिली.