
कोल्हापूर प्रतिनिधी: हॅकर्स जॉईंट ॲक्शन कमिटी व श्रमिक सेवा संस्था यांच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कामगार दिन उत्साहात पार पडला शिंगोशी मार्केट व खाऊ गल्ली येथे केक कापून कामगार दिनाच्या फेरीवाले पथारीवाले स्टॉल वाले घरेलू महिला यांना शुभेच्छा देण्यात आल्या हॉकर्स कमिटीच्या माध्यमातून फेरीवाले स्टॉल वाले यांना फुडचे प्रशिक्षण देण्यात आले होते त्याचे शासनाचे प्रमाणपत्र यावेळी शहराध्यक्ष संदीप साळुंखे बचत गटाच्या सौ अशा सावंत सौ राधिका सावंत खाऊ गल्लीचे सचिव विक्रांत भागोजी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले यावेळी हॉकर्स जॉईंट ॲक्शन कमिटीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सौ निर्मला प्रमोद कुराडे यांनी शिंगोशी मार्केट येथील महिलांच्या स्वच्छतागृहाबद्दल चौकशी केली व तिथल्या महिलांना स्वच्छतागृह लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावेत व बसण्याची ठिकाणे व्यवस्थित असावीत पाण्याच्या पिण्याची सोय व्हावी अशी मागणी केली आहे

फेरीवाले यांचा झोन झाला पाहिजेत सर्वे झाला पाहिजे लायसन्स मिळाले पाहिजेत स्वस्त दरात यांना घर उपलब्ध करून मिळाली पाहिजेत साठ वर्षानंतर यांना शासनाकडून तीन हजार रुपये पेन्शन उपलब्ध करून दिली पाहिजे अशी मागणी केली आहे. हॉकर्स कमिटीचे अध्यक्ष सौ निर्मला प्रमोद कुराडे यांनी फेरीवाल्यांना स्टॉल वाल्यांना केक भरून त्यांचे त्यांनी कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या अशा पद्धतीने हा कामगार दिन उत्साहात पार पडला.
