
प्रतिनिधी श्रीकांत शिंगे
गार्गीज डीआयडी फाउंडेशन आणि बिग मॅडी वेल्फेअर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य अशा पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच रेडियंट हॉटेल येथे करण्यात आले. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा यावेळी गौरव करण्यात आला.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राज्य राखीव पोलीस दलाचे सहाय्यक समादेशक सदानंद सदांशिव, दैनिक रोखठोकचे कार्यकारी संपादक व इंडियन पोलीस मित्र संस्थेचे मुख्य अधिकारी डॉ. सुरेश राठोड, एलआयसीचे राजेंद्र तामगावकर, आर.एस.पी अधिकारी अभिजीत तासगावकर, आणि अभिजीत विभुते यांची उपस्थिती लाभली.

या कार्यक्रमाचे आयोजन डॉ. मॅडी तामगावकर यांनी केले होते. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन मेघराज हत्ती यांनी केले.
कार्यक्रमात विशेष उल्लेखनीय कामगिरीबद्दल मुंबईहून आलेल्या प्रोफे ममता मसूरकर,यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच निर्माते डॉ. अशोक सूर्यवंशी यांनाही त्यांच्या योगदानाबद्दल विशेष सन्मान प्रदान करण्यात आला.
संपूर्ण कार्यक्रम उत्साहात व सुसंगतपणे पार पडला, आणि उपस्थितांनी आयोजनाचे कौतुक केले, नूतन IAS हेमराज पनोरेकर यांनी या कार्यक्रमास फोनद्वारे शुभेच्छा दिल्या, डॉ मॅडी तामगावकर यांनी उपस्थित व्यक्तींचे आभार मानले .










