
प्रतिनिधी किशोर घाडगे
उत्तराखंड येथून आलेले युवक कार्तिक सिंग यांनी छत्रपती शिवाजी महाराजांप्रती असीम प्रेम व निष्ठा व्यक्त करत एक अद्वितीय आणि प्रेरणादायी मोहिम हाती घेतली आहे. त्यांनी सायकलवरून छत्रपती शिवाजी महाराजांचे साडेतीनशे गड-किल्ले पादाक्रांत करण्याचा संकल्प केला असून, आतापर्यंत त्यांनी ५२ किल्ल्यांचा यशस्वी प्रवास पूर्ण केला आहे.
सध्या ते कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा, विशाळगड यांसारख्या ऐतिहासिक किल्ल्यांचे दर्शन घेऊन शिवभक्तीत न्हालेल्या वातावरणात पुढील प्रवासास निघाले आहेत. त्यांच्या या अद्वितीय कार्याचा सकल हिंदू समाजातर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौक, कोल्हापूर येथे उत्साहात सत्कार करण्यात आला.
या सत्कार समारंभाला उदय भोसले, किशोर घाटगे, अभिजीत पाटील, अर्जुन आंबी यांसारखे हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी कार्तिक सिंग यांच्या कार्याची मन:पूर्वक प्रशंसा केली व त्यांच्या पुढील मोहिमेस शुभेच्छा दिल्या.
कार्तिक सिंग यांनी या मोहिमेला प्रारंभ करून चार महिने पूर्ण केले असून, उर्वरित गड-किल्ल्यांचा प्रवास पूर्ण करण्यासाठी सुमारे दीड वर्षाचा कालावधी लागेल, अशी माहिती त्यांनी दिली. त्यांच्या मोहिमेच्या मागे छत्रपती शिवाजी महाराजांप्रती असलेला स्वाभिमान, अभिमान व श्रद्धा हेच प्रेरणास्थान असल्याचे त्यांनी नमूद केले.
या प्रेरणादायी कार्याची दखल घेऊन आपल्या लोकप्रिय दैनिकांमध्ये वरील बातमी प्रसारित करण्यात यावी, अशी विनंती सकल हिंदू समाजातर्फे करण्यात येत आहे.